Full Width(True/False)

१० कोटी लोकांसाठी सोनू सूद ठरणार मसिहा; वाचा नेमकं काय करणार आहे अभिनेता

मुंबई: करोना व्हायरसनं मागच्या वर्षभरापासून जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक तरूण या काळात बेरोजगार झाले. तर अनेक कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. पण या सर्वांसाठी अभिनेता सुपरहिरो ठरला. लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतरही सोनूनं लोकांना मदत करत राहिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या लोकांनी त्याच्याकडे मदत मागितली अशांनाही त्यानं मदत केली. एवढंच नाही तर त्यानं ट्विटरवर त्यांना रिप्लाय सुद्धा दिले होते. त्यानंतर आता सोनूनं एक लाख लोकांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे सोनू सूद सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. सोनूनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'नवे वर्ष, नव्या आकांक्षा आणि नवी उमेद. आता एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था केली आहे. ५ वर्षात सुमारे १० कोटी लोकांचे जीवन बदलण्याचा विचार आहे. आजच गुडवर्कर अ‍ॅप डाऊनलोड करा आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करा.' कोरोना लॉकडाऊन दरम्यान सोनू सूदनं प्रवासी कामगारांना घरी पोहोचण्यास मदत केली होती. अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी आणि खेड्यात नेण्यासाठी या अभिनेत्यानं वैयक्तिक पातळीवर मदत केली होती. त्यानंतर आता त्याने बेरोजगारांना नोकरी देण्याचं जाहीर केले आहे. हा त्याचा एक खूप मोठा उपक्रम आहे. सोनू सूदनं या वर्षात एक लाख लोकांना नोकरी देणार असल्याचं म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं सविस्तर माहिती दिली आहे. यातूनच येत्या ५ वर्षांत सोनू १० कोटी लोकांचं आयुष्य बदलण्याचा विचार करत आहे. सोनू सूदच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याचा किसान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या व्यतिरिक्त त्याच्याकडे अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'पृथ्वीराज' हा चित्रपट सुद्धा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eLck5g