Full Width(True/False)

अजय देवगणला मारहाणीचा व्हिडीओ खरा की खोटा? प्रवक्ते म्हणतात...

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला मारहाण केली जात असल्याचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कार पार्किंगवरुन अजय देवगणचं कर्मचाऱ्यांशी भांडण झालं आणि त्यानंतर हे भांडण मारहाणीपर्यंत गेलं असं दावा या व्हिडीओबाबत केला जात आहे. पण या व्हिडीओमध्ये ज्याला मारहाण केली जात आहे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यानं तो अजय देवगणच आहे असं सांगता येत नाही. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याच्या टीमकडून या व्हिडीओवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ज्यात हा व्हिडीओ खोटा असल्याचं म्हटलं आहे. अजय देवगणच्या टीमनं एक स्टेटमेंट ट्विटरवर शेअर केलं आहे. ज्यात त्यांनी लिहिलं, अजय देवगणचं भांडण आणि मारहाणीबाबत व्हायरल होत असलेला व्हिडीओ खोटा आहे. आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करतो की, यावर विश्वास ठेवू नये मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्येच त्याचे आगामी चित्रपट मैदान, मेडे आणि गंगूबाई काठियावाडीचं शूटिंग करत आहे. मागच्या १४ महिन्यापासून तो दिल्लीला गेलेलाच नाही. जानेवारी २०२०मध्ये 'तान्हाजीः द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय शेवटचा दिल्लीला गेला होता. या स्टेटमेंटमध्ये पुढे सांगितलं आहे की, अजय देवगण नेहमीच जबाबदारीनं आणि सामाजिक शिष्टाचारांचं भान ठेवून वागतो. हा व्हिडीओ चुकीचा आहे. यात दिसणारी व्यक्ती अजय देवगण नाही. त्यामुळे अशाप्रकारचं कोणतही वृत्त प्रकाशित करण्याआधी सत्य परिस्थिती समजून घ्या. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओनुसार दिल्लीमध्ये झालेल्या दोन गटातील मारहाणीत अजय देवगणचं नाव जोडलं जात आहे. एका सोशल मीडिया युझरनं या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. ज्यात पांढऱ्या रंगाचं शर्ट घातलेल्या व्यक्तीला मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे. 'मला माहीत नाही हा अजय देवगण आहे की नाही पण शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये खूप राग आहे आणि त्यामुळेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमध्ये अजय देवगण असल्याचा दावा केला जात आहे.' असं हा व्हिडीओ शेअर करताना त्या युझरनं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dvScC7