मुंबई ः हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री यांनी आपल्या करीअरमध्ये अनेक उत्तमोत्तम सिनेमांत काम करत अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत सिनेमांत काम केले आहे. पद्मिनी कोल्हापुरे यांनी 'ई टाम्स'ला दिलेल्या एका खास मुलाखतीत 'राम तेरी गंगा मैली' सिनेमात काम न करण्याचे कारण सांगितले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर तुफान यशस्वी ठरला होता. काय होते नेमके कारण?पद्मिनी कोल्हापुरे यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'राम तेरी गंगा मैली' सिनेमात काम करण्यासाठी विचारले होते.परंतु त्यात असलेल्या किसींग सीन असल्याने हा सिनेमा त्यांनी नाकारला. त्यानंतर मंदाकिनी हिची या सिनेमासाठी निवड झाली. पद्मिनी कोल्हापुरे यांनी पुढे सांगितले की, या सिनेमासाठी हिरॉईन मंदाकिनी हिला घेतल्यानंतर आणि ४५ दिवस चित्रिकरण केल्यानंतरही राज कपूर यांना पद्मिनीच हिरॉईन म्हणून हव्या होत्या. हा सिनेमा नाकारल्याबद्दल वाईट वाटते का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या, की आपल्याकडे येणा-या सिनेमाच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपण सहभागी होऊ शकत नाही. परंतु तो सिनेमा जेव्हा हिट होतो, तेव्हा आपण त्या सिनेमाचा भाग असायला हवे होते असे नक्कीच वाटते. अशा शब्दांत आपली खंत व्यक्त केली. हे ही सिनेमे नाकारलेया मुलाखतीमध्ये पद्मिनी यांनी पुढे सांगितले की, 'एक दुजे के लिए' या सिनेमातील रती अग्निहोत्री हिने साकारलेली भूमिका, 'सिलसिला' मधील रेखाने साकारलेली भूमिका आणि 'तोहफा' सिनेमातील श्रीदेवी हिने साकारलेली भूमिकेसाठी विचारणा झाली होती. परंतु हे सिनेमा काही कारणांमुळे त्यांना करता आले नाही. 'राम तेरी गंगा मैली' सिनेमात मंदाकिनी हिने चांगले काम केले. यातील गाणीही चांगली होती. राज कपूर यांनी मला या सिनेमासाठी विचारले होते, परंतु मी त्यात काम करायला का नाही म्हटले याचे कारण त्यांना माहिती होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. किसिंग सीनचे टेन्शन होते पद्मिनी यांनी पुढे सांगितले की, 'या सिनेमात असलेल्या ब्रेस्टफिडींगच्या सीनबद्दल माझी काहीच हरकत नव्हती. तो पटकथेचा एक भाग होता. माझ्याशी जेव्हा प्रोजेक्टबद्दल चर्चा सुरू होती तेव्हा यातील किसिंग सीनचे टेन्शन आले. पडद्यावर किसिंग सीन करताना मी कंम्फर्टेबल नसल्याने मी या सिनेमात काम करायला दिला. नंतर या सिनेमाचे मंदाकिनीला घेऊन ४५ दिवसांचे चित्रिकरण झाल्यानंतरही राज कपूर यांनी पुन्हा मला या भूमिकेसाठी विचारणा केली होती.' पद्मिनी यांच्या मुलाचे लग्न दरम्यान, काही दिवसांपूर्वी पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा याचे लग्न प्रोड्युसर करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानी हिच्यासोबत झालं. या लग्नाला त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्रमंडळी मालदीवला गेले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2O1dZsm