मुंबई- बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अभिनयासोबत तिच्या उंची राहणीमानासाठी देखील प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. फॅशन आयकॉन म्हणून प्रेक्षकांमध्ये तिची वेगळी ओळख आहे. सोशल मीडियावर नेहमी तिच्या महागड्या कपड्यांची चर्चा असते. ती देखील तिचे निरनिराळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांमध्ये कधी तिच्या जॅकेटची चर्चा असते तर कधी तिच्या महागड्या ड्रेसची. काही दिवसांपूर्वी उर्वशीला मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. ती तिच्या तामिळ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करून दिल्लीहून मुंबईत आली होती. परंतु, यावेळेस तिच्या कपड्यांऐवजी दुसऱ्याच गोष्टीची चर्चा रंगली होती. ती म्हणजे उर्वशीची काळ्या रंगाच्या पाण्याची बाटली. उर्वशीच्या हातातील पाण्याची बाटली साधी नसून त्यात अल्कलाइन पाणी होतं. ज्यावर फुलविक ऍसिड द्वारे प्रक्रिया केली जाते. हे पाणी शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यास मदत करतं शिवाय शरीराचं पीएचही नियंत्रणात ठेवतं. हे पाणी प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि काम करण्यास उत्साह वाटतो. शरीराला सुडौल ठेवण्यातही हे पाणी मदत करतं. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी हे पाणी पिताना दिसतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार देखील हेच पाणी पितो. महत्वाचं म्हणजे, या पाण्याची किंमत थोडी थोडकी नाही तब्बल २०० रुपये प्रति लिटर आहे. या पाण्याला उपयोगी बनवण्यासाठी ज्या मिनरल्सचा वापर केला जातो, त्यांचा रंग काळा आहे. ७० टक्के मिनरल्स पाण्यामध्ये टाकले जातात त्यामुळे या पाण्याचा रंगदेखील काळा होतो. उर्वशी सध्या तिच्या आगामी वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. ही सीरिज पोलीस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या आयुष्यावर आधारित एक सत्य घटना आहे. उर्वशीने जिओ स्टुडिओसोबत तीन चित्रपटांचा करार केला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tJroVf