नवी दिल्लीः उद्या २३ मार्च रोजी नवीन फ्लॅगशीप ९ सीरीज स्मार्टफोन सोबत वनप्लस आपली फर्स्ट जनरेशन स्मार्टवॉच लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनीचे सीईओ पीट लाउने सोशल मीडियावर स्मार्टवॉचच्या फीचर्स संबंधी खुलासा केला आहे. वाचाः लाउने सोशल मीडियावर सांगितले की, ११० हून जास्त वर्कआउट मोड सपोर्ट करणार आहे. ट्विट मध्ये एक छोटा एनिमिटेड व्हिडिओ सुद्धा समावेश आहे. ज्यात काही वर्क आउट मोड सारखे फीचर्स वॉकिंग, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, क्रिकेट, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, फ्री-ट्रेनिंग आणि शूटिंग यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. वाचाः वनप्लस वॉचचे संभावित फीचर्स स्मार्टवॉच मध्ये स्नॅपड्रॅगन वियर सिस्टम ऑन चिपची सुविधा मिळणार आहे. हे संभावित आहे की, लाँच केलेल्या स्नॅपड्रॅगन वियर ४१०० असू शकते. हे वनप्लस टीव्ही साठी रिमोटचे काम करणार आहे. याशिवाय, वॉच कॉलिंग, डिस्प्ले नोटिफिकेशन, कंट्रोल मीडिया प्लेबॅक, सह अनेक काम करण्यात सक्षम आहे. वाचाः वनप्लस वॉचमध्ये बॅटरी सेव करण्यासाठी ओएलईडी डिस्प्ले पॅनेल दिला जाऊ शकतो. यासाठी यात फिटनेस आणि हेल्थ फीचर्स म्हणून हार्ट रेट सेन्सर, ब्लूड ऑक्सिजन मॉनीटर आणि साफ्टवेयर-बेस्ड फीचर्स सारखे स्लीप पॅटर्न एनालिसिस गोल ओरिएंटेड एक्सरसाइज ट्रॅकिंग सहर अनेक फीचर्सचा समावेश आहे. वनप्लसचे सीईओ यांनी सांगितले की, या डिव्हाइससाठी कंपनी प्राथमिकता फॅशनेबल डिझाइन, सहज कनेक्टिविटी आणि बेस्ट इन क्लास युजर एक्सपिरियन्स देते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tCmppg