मुंबई ः अभिनेता विविध जॉनरचे सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे केलेले अॅक्शन, रोमँटिक, कॉमेडी आणि देशभक्तीपर सिनेमांत काम करत सिनेचाहत्यांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अक्षयने काम केलेल्या 'केसरी' या सिनेमाला पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने हा सिनेमा आपण केला त्याचे कारण सांगत यात काम करण्याचा आनंदच काही वेगळा होता, असेही अक्षयने सांगितले आहे. अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हँडलवर 'केसरी' सिनेमासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो शत्रूच्या विरोधात लढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना अक्षयने लिहिले आहे की, '१०,००० आक्रमण करणा-या शत्रूच्या विरोधात केवळ २१ शिख लढले! या सिनेमात काम करण्यासाठी माझ्यासाठी ही एकच ओळ पुरेशी होती.' अनुराग सिंह दिग्दर्शित 'केसरी' सिनेमा प्रत्यक्ष घटनेवर आधारीत आहे. या सिनेमात २१ शूर शिखांची कथा आहे. हे शूर शिख शिपाई दहा हजार अफगाणी घुसखोरांविरोधात धैर्याने लढले होते. या सिनेमात अक्षयकुमारने हवालदार ईश्वर सिंह याची भूमिका केली होती. या सिनेमात परिणीती चोप्रा ही होती. अक्षय या सिनेमांत करतोय काम आगामी काळात अक्षयचे बरेच सिनेमे येणार आहेत. त्यामध्ये 'सूर्यवंशी', 'अतरंगी रे', 'बेल बॉटम', 'पृथ्वीराज', 'रक्षाबंधन', 'बच्चन पांडे' या सिनेमांचा समावेश आहे. नुकताच अक्षयकुमारने 'रामसेतु' या सिनेमाचा अयोध्येमध्ये मुहूर्ताचा शॉट शूट करण्यात आला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3c6xzfZ