Full Width(True/False)

खबरदारी घ्या, सावध व्हा, आता इन्कम टॅक्स रिटर्नच्या नावाने फ्रॉड

नवी दिल्लीः सर्व टॅक्स पेयर्स ज्यावेळी () दाखल करतात. त्यात आपला रिफंड परत मिळवण्यात काही दिवस लागतात. अनेकदा एक महिन्यांपासून ३ ते ४ महिन्यांची वेळ पण लागू शकते. याचा गैरफायदा काही सायबर गुन्हेगार घेत आहेत. ते चुकीची माहिती सांगून लोकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. सोमवारी आलेल्या एका नवीन रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे. वाचाः लोकांना संदिग्ध मेसेज येत आहेत. ज्यात लोकांना इन्कम टॅक्स रिफंडसाठी अर्ज सबमिट करण्यास सांगितले जात आहे. यानंतर लोकांना एक लिंक पाठवून त्याद्वारे वेबपेजवर रि-डायरेक्ट केले जाते. हे दिसायला आयकर ई-फायलिंग वेब पेज सारखे दिसते. यादरम्यान फ्रॉड करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय (ICICI), एचडीएफसी (HDFC), अॅक्सिस बँक (Axis Bank) आणि पंजाब नेशनल बँक (PNB) च्या नावाचा वापर केला जात आहे. दिल्ली बेस्ड थिंक टँक सायबरपीस फाउंडेशन सोबत सायबर सिक्योरिटी फर्म ऑटोबोट इन्फोसिकने याची माहिती उघड केली आहे. वाचाः या फ्रॉडमध्ये सेफ https च्या जागी सामान्य http प्रोटोकॉलचा वापर केला जात आहे. यावरून स्पष्ट होते की, कोणत्याही नेटवर्क किंवा इंटरनेट ट्रॅफिकला रोखता येऊ शकते. युजर्संचा चुकीचा वापर करून त्याची माहिती सहज प्राप्त करू शकता येते. याशिवाय यात युजर्संना गुगल प्ले स्टोरच्या जागी थर्ड पार्टी सोर्सवरून अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ज्यावेळी ग्रीन रंगाच्या प्रोसीड टू द व्हेरिफिकेशन स्टेप्स बटनवर क्लिक केल्यानंतर युजर्सला त्यांचे पूर्ण नाव, पॅन, आधार नंबर, पत्ता, पिनकोड, जन्म तारीख, मोबाइल नंबर, ई-मेल अॅड्रेस, जेंडर, वैवाहिक स्थिती, आणि बँकींग माहिती जसे अकाउंट नंबर, आयएफसी कोड , कार्ड नंबर एक्सपायरी डेट, सिव्हीव्ही, कार्ड पिन सारखी माहिती भरा, असे सांगितले जाते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30QdjZE