Full Width(True/False)

आईनं दोन लग्न केली तू पाच करणार का? लेकीला ट्रोल करणाऱ्यांना श्वेताचं सणसणीत उत्तर

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेता तिवारीनं आपल्या पर्सनल लाइफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर सध्या ती खूप चर्चेत आहे. या मुलाखतीत श्वेतानं कशाप्रकारे ती कौटुंबिक हिंसेची शिकार झाली आणि तिला नवरा मुलीसमोर कसं मारायचा आणि त्यामुळे मुलांवर काय परिणाम झाले या सगळ्यावर सविस्तर सांगितलं. तसेच यावेळी अभिनेत्रीनं सोशल मीडियावरून होणाऱ्या ट्रोलिंगवरही भाष्य केलं, ज्याची शिकार तिची मुलगी पलक वारंवार होत असते. 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखातीत श्वेतानं सोशल मीडियावर लोक मला तिसऱ्यांदा लग्न न करण्याविषयी सुचवतात. पण यासोबतच ते पलकला सुद्धा आईनं दोन लग्नं केली तर तू पाच लग्नं करशील असं म्हणून ट्रोल करतात असंही सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा लोक १० वर्ष लिव्ह इनमध्ये राहून वेगळे होतात त्यावेळी त्यांना कोणी काही बोलत नाही. पण जेव्हा तुमचं लग्न मोडतं तुम्ही घटस्फोट घेता त्यावेळी लोक तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अनेक लोक मला सोशल मीडियावर सांगातात की आता तू तिसरं लग्न नको करू. मी हा प्रश्न त्यांना विचारलं आहे का? मला असा सल्ला देणारे ते आहेत कोण? माझ्या लग्नासाठी ते खर्च करणार आहेत का? हा माझा वैयक्तीक प्रश्न आहे पण तरीही लोक मला सल्ला देतात.' अभिनेत्री पुढे म्हणाली, 'सोशल मीडियावर अनेकदा लोक असं म्हणतात की, मी दोन लग्न केली तर पलक कमीत कमी पाच लग्न तर नक्कीच करेल. पण मला वाटतं ती लग्नच करणार नाही. तिनं माझ्यासोबत जे काही होताना पाहिलं आहे ते पाहिल्यानंतर ती लग्नाचा विचारही करणार नाही. ती तिचा निर्णय नक्कीच विचार करून घेईल.' अभिनेत्री श्वेता तिवारीनं राजा चौधरीशी वयाच्या १९ व्या वर्षी लग्न केलं होतं. पण २००७ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. श्वेतानं राजा चौधरीवर कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप लावला होता. ज्यानंतर हे दोघंही वेगळे झाले. त्यानंतर श्वेतानं २०१३ मध्ये अभिनेता अभिनव कोहलीशी लग्न केलं. पण दुर्दैवानं तिचं हे लग्न सुद्धा फार काळ टिकलं नाही आणि श्वेतानं अभिनवपासूनही घटस्फोट घेतला. अभिनवनंही आपल्या मारहाण केल्याचा आणि धमक्या दिल्याचा आरोप श्वेतानं केला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m8Wov6