नवी दिल्लीः सॅमसंगचा फ्लॅगशीप स्मार्टफोन Galaxy S20 FE 5G ला अखेर आज भारतात लाँच केले आहे. Samsung India च्या वेबसाइटवर हा फोन खरेदीसाठी आता उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने भारतात गॅलेक्सी एस २० एफई ४जी व्हेरियंट आधीच लाँच केले आहे. आता दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग भारतात Galaxy S20 FE ला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सोबत ५जी व्हेरियंट मध्ये आणले आहे. यासोबत फोनला सहा कलर व्हेरियंट्स मध्ये आणले आहे. या कलरमध्ये लॅवेंडर, मिंट, नेवी, व्हाइट, रेड आणि ऑरेंज आहे. वाचाः ची किंमत सॅमसंगच्या या फोनची किंमत ५५ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या फोनवर ८ हजार रुपयांचा इंस्टेंट कॅशबॅक दिला जात आहे. यानंतर या फोनची किंमत ४७ हजार ९९९ रुपये आहे. ही ऑफर ३१ मार्च पासून मिळेल. सॅमसंगच्या या फोनला Samsung.com, Amazon आणि Samsung च्या एक्सक्लूसिव स्टोर्स आणि अन्य रिटेल आउटलेट्सवर खरेदी करू शकतात. या फोनचा सामना OnePlus 9, Vivo X60 Pro, ROG फोन 5 आणि गेल्या वर्षी लाँच झालेल्या OnePlus 8 Pro सोबत iPhone 11 शी होणार आहे. वाचाः 5G ची फीचर्स सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ SoC प्रोसेसर मिळणार आहे. फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट करतो. अँड्रॉयड ११ बेस्ड सॅमसंगच्या वन यूआयवर काम करतो. हँडसेट मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस (2400x1080 पिक्सल) सुपर अमोलेड इनफिनिट ओ डिस्प्ले दिले आहे. स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळाली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः Samsung Galaxy S20 FE 5G कॅमेरा स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत येतो. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fqttBC