मुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे निरनिराळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्वशीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच. त्यासोबत तिने तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईलने प्रेक्षकांच लक्षदेखील वेधून घेतलं. सोशल मीडियावर उर्वशीच्या कपड्यांची देखील तितकीच चर्चा असते. नुकतेच उर्वशीने सोशल मीडियावर तिचे लाल रंगातील गाऊन मधील फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून चाहत्यांनी उर्वशीच्या सौंदर्याचं कौतुक केलं. सोबत त्यांनी तिने परिधान केलेल्या गाउनचं देखील कौतुक केलं आहे. उर्वशीने ६६ व्या पुरस्कार सोहळ्यासाठी हा गाउन परिधान केला होता. चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनीही तिचं कौतुक केलं. या सोहळ्यासाठी उर्वशीने घातलेला सिक्वेन हॉल्टर गाऊन अतिशय महाग आहे. या गाऊनची खासियत म्हणजे गाऊनच्या कंबरेच्या भागाजवळ सॅटिनची रिबीन लावण्यात आली आहे. ती रॅप स्टाईलमध्ये उर्वशीच्या कमरेभोवती लावण्यात आली आहे ज्यामुळे गाऊनचा लुक पूर्णपणे बदलतो. सोबत कॉलर बो असल्याने गाऊन आणखी उठून दिसतो. या गाऊनला डिझायनर मोनिशा जयसिंग हिने तयार केलं आहे. यासोबत उर्वशीने हातात अनेक हिऱ्यांची ब्रेसलेट घातली आहेत. हे सर्व ब्रेसलेट , , Minerali, Louis Vuitton, Givenchy, Maison Valentino या महागड्या ब्रॅण्डचे आहेत. तिच्या लुकला आणखी आकर्षक बनविण्यासाठी तिने हेअर एक्सटेन्शन विग लावला आहे. सोबत तिच्या हातात हिऱ्यांच्या अंगठ्या देखील आहेत. या लुकमध्ये तिने अनेक फोटो काढले आहेत. जे चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. तिच्या एकूण लुकसाठी तब्बल ३५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. इतक्या महागड्या ड्रेसमुळं उर्वशी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rFsq3b