Full Width(True/False)

वाढदिवसानिमित्त राणी मुखर्जीकडून चाहत्यांना मिळाली 'ही' खास भेट

मुंबई- बॉलिवूडची '' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आज २१ मार्च रोजी तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाने राणीने प्रेक्षकांमध्ये तिचं वेगळं स्थान निर्माण केलं. राणीने अनेक हिट चित्रपटात काम केलं. काही फिमेल लीड असणारे चित्रपटही राणीने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सादर केले. तिच्या भूमिकांचं प्रेक्षकांनी नेहमी कौतुक केलं. राणीने प्रेक्षकांना वाढदिवसाला नवीन चित्रपटाची घोषणा करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता तिने ते आश्वासन पूर्ण केलं आहे. राणीने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'मर्दानी', 'हिचकी', 'मर्दानी २', 'तलाश', 'ब्लॅक' सारख्या हिट चित्रपटांनंतर राणीने तिच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव '' असून यात ती एका आईची भूमिका साकारणार आहे जी तिच्या मुलीसाठी संपूर्ण देशासोबत लढणार आहे. हा चित्रपट झी स्टुडिओज सोबत मोनिशा आडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल आडवाणी यांच्या एमे एंटरटेनमेंटची निर्मिती असणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आशिमा छिब्बर करणार असून चित्रपटाची पूर्व तयारी सुरू झाली आहे. लवकरच चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना राणी म्हणाली की, 'आपला वाढदिवस साजरा करण्याची याशिवाय दुसरी सुंदर पद्धत असूच शकत नाही जेव्हा एवढ्या खास चित्रपटाची घोषणा होते. 'मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे' हा चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट असून सर्व आईंना समर्पित आहे.' आपल्या वाढदिवसासोबतच राणीने बॉलिवूडमध्ये २५ वर्ष पूर्ण केली आहेत. तिने १९९६ साली 'बियेर फूल' या बंगाली चित्रपटातून पदार्पण केलं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने त्याचं वर्षी 'राजा की आएगी बारात' या चित्रपटातून पदार्पण केलं. राणीचा 'बंटी और बबली २' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे ज्यात ती सैफ अली खान सोबत दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/391WyPA