मुंबई- छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम असलेला '' स्पर्धकांसाठी लोकप्रियतेची चावी आहे. 'बिग बॉस' मध्ये गेल्यावर अनेकांचं नशीब बदललं. त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. प्रत्येकजण 'बिग बॉस' मध्ये जाण्यासाठी उत्सुक असतो. अनेक कलाकार तर 'बिग बॉस' मध्ये जाण्यासाठी काहीही करायला तयार होतात. परंतु, अशीही एक कलाकार आहे जिने 'बिग बॉस' च्या घराला तुरुंग म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती. घरातून बाहेर पडल्यावर तिने अनेक मोठे खुलासे केले होते. 'हंगामा', 'धूम', 'फिर हेरा फेरी', 'गोलमाल', 'क्यूँ की' यांसारख्या हिट चित्रपटात काम करणारी अभिनेत्री रिमी सेन सध्या चित्रपटांपासून दूर आहे. गेली अनेक वर्ष ती एकाही चित्रपटात झळकलेली नाही. रिमी सेन 'बिग बॉस' च्या ९व्या सीजनची स्पर्धक होती. ती जवळपास ५० दिवस घरात स्पर्धक म्हणून राहिली होती. 'बिग बॉस' मध्ये राहण्याचे तिला दोन कोटी रुपये मिळले होते. ज्या दिवशी रिमी 'बिग बॉस' च्या घरातून बाहेर आली त्यादिवशी प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने म्हटलं की, 'मला वाटतंय की मी तुरुंगातून बाहेर आली आहे. मला खूप आनंद होत आहे. जितके दिवस मी घरात राहिली त्या दिवसांनी मला माझ्या स्वातंत्र्याची किंमत समजावली. ' तिने त्यासोबतच म्हटलं, 'आता मला 'बिग बॉस' च्या घराप्रमाणे भांडी घासावी लागणार नाहीत.' रिमीच्या घरातील वागण्याला इतर सदस्य कंटाळले होते. ती घरातील सदस्यांशी वाईट पद्धतीने बोलायची. शिवाय ती घरात कोणतंही काम करत नसे. तिच्या या वागण्यावर सलमान खानने तिची अनेकदा शाळा घेतली होती. घरात असताना तिने म्हटलं होतं की, तिला लग्न करायचं नाही कारण ती त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही. आजही रिमी एकटी राहते. तिने अजून लग्न केलेलं नाही. चित्रपटांच्या निर्मितीसाठी रिमीने चित्रपटांमध्ये अभिनय करणं सोडलं होतं. परंतु आता रिमीला पुन्हा चित्रपटांमध्ये पदार्पण करायचं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3c84ssE