Full Width(True/False)

मलायकाने शेअर केला असा काही फोटो की नेटकऱ्यांनी केले ट्रोल

मुंबई- बॉलिवूडमधील कलाकार कशा पद्धतीने होळी, धुळवड साजरी करतात याकडे सगळ्या सिनेप्रेमींचे लक्ष असते. मग कलाकारही त्यांच्या आयुष्यातील हे क्षण आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यंदा मात्र, हा उत्सव सार्वजनिक पातळीवर साजरा करण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे कलाकारांनी आपल्या घरीच होळी, धुळवड साजरी केली. मलायका अरोरा हिने देखील होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कौतुक आणि टीकाही मलायका अरोरा ही सातत्याने आपल्या वेगवेगळ्या अदामधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अगदी तिच्या वर्कआऊटपासून ते वेगवेगळ्या आऊटफिट आणि पार्टींचे बरेचसे फोटो ती शेअर करत असते. आता होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवरही मलायकाने जे दोन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ते पाहून तिचे चाहते दंग झाले आहेत. एका फोटोत पूल साईडला एका सोफ्यावर एकदम रिलॅक्स मूडमध्ये मलायका बसली आहे. यावेळी ती कलरफुल ड्रेस घातला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने हॅपी होली एवढंच लिहिलं आहे. तिच्या या फोटोवर नेटकरी भरभरून प्रतिसाद देत आहेत, तर काही तिच्या या बोल्ड लूकवर टीका करत आहेत. दरम्यान, होळीच्या एक दिवसआधी मलायकाने एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये मलायकाने पाठमोरा फोटो पोस्ट करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वजण सुरक्षित घरी रहा असे आवाहन तिने यावेळी केले होते. होळीच्या पार्श्वभूमीवर तिने अशा प्रकारचा फोटो टाकल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. दरम्यान, मलायका अरोरा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सातत्याने शेअर करते असते. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. हे दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात, परंतु त्या दोघांनी कधीही आपल्या नात्याबद्दल खुलेपणाने काही सांगितलं नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fp5sL4