नवी दिल्लीः रियलमी ३१ मार्च रोजी आपला नवीन स्मार्टफोन ला लाँच करणार आहे. फोनला कंपनी सर्वात आधी चीनमध्ये लाँच करणार आहे. लाँच आधी या स्मार्टफोनला बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर स्पॉट करण्यात आले आहे. लिस्टिंग मध्ये या अपकमिंग स्मार्टफोनसंबंधी अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. गीकबेंच लिस्टिंगनुसार, फोनचे मॉडल नंबर RMX3031 आहे. फोनला गीकबेंचच्या सिंगल कोर टेस्टमध्ये ९७५ आणि मल्टी कोर टेस्ट मध्ये ३३२० चा स्कोर मिळाले आहे. वाचाः रियलमी GT Neo चे फीचर गीकबेंच लिस्टिंग मध्ये रियलमीचा हा अपकमिंग स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम आणि मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसर दिला आहे. ओएस मध्ये फोन अँड्रॉयड ११ वर चिपसेटवर काम करणार आहे. कंपनीचा हा फोन 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०.९ आणि रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. कंपनी या फोनला फायनली फँटसी सोबत काही आणि कलर ऑप्शनमध्ये लाँच करू शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेराचा समावेश आहे. सेल्फीसाठी रियलमी जीटी नियो मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. वाचाः या फोनमध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 4500mAh ची दमदार बॅटरी मिळू शकते. फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कंपनी लिक्विड कूल्ड हीट डिस्सीपेशन, ४डी व्हायब्रेशन आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट ऑफर करू शकते. फोनचे इंटरनल स्टोरेज १२८ जीबीचे असणार आहे. या फोनची किंमत २५ हजार रुपयांच्या जवळपास असू शकते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fxXhfs