Full Width(True/False)

...आणि सोनूला जुने दिवस आठवले! स्पाईस जेटने सोनू सूदला दिली अनोखी मानवंदना

मुंबई ः लॉकडाऊनमध्ये मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या कामगारांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी खूप मदत केली होती. सोनूने केलेल्या या कामामुळे त्याची तुलना देवाशी करण्यात येऊन त्याचे मंदिरदेखील बांधण्यात आले आहे. केवळ इतकेच करून सोनू थांबलेला नाही तर तो त्याला जमेल तशी लोकांना मदत करत आहे. त्यामुळेच अभिनयाबरोबरच सोनू सामाजिक कामातही सक्रीय असल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेता याने केलेल्या या कामाची दखल स्पाइस जेट या विमान कंपनीने घेतली आहे. आता सोनू सूदच नाव फक्त लोकांच्या मनात नाही तर गगनात सुद्धा दिसणार आहे. सोनू सूदच्या या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी स्पाइसजेटने त्यांच्या डोमेस्टिकसाठी वापरल्या जाणारे एक विशेष प्रवासी विमान त्याला समर्पित केले आहे. स्पाइसजेटने अनावरण केलेल्या बोईंग ७३७ या विमानावर सोनूचा फोटो लावला आहे. या फोटोसोबतच स्पाइस जेटने सोनूसाठी “देवदूत सोनू सूदला वंदन” अशा आशयाची ओळ त्यांनी लिहिली आहे. स्पाईस जेट ने ट्विट रिट्विट करत सोनूने त्यांचे आभार मानले असून तो लिहितो “विना आरक्षित तिकीटावर पंजाबमधील मोगा ते मुंबई पर्यंत केलेला प्रवासाची आठवण झाली. आज मला माझ्या आई-वडीलांची खूप आठवण येत आहे.” यावेळी सोनूने स्पाइस जेटच्या त्या विमानाचे काही फोटो शेअर केले आहेत. सोनूच्या या ट्विटची चर्चा सर्वत्र सुरू आहे. असा सन्मान मिळालेला तो पहिलाच भातीय अभिनेता आहे. अलीकडेच सोनू सूदने बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं आहे. देशातील तब्बल १ लाख स्थलांतरितांना रोजगार मिळवून देणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. सोनूच्या या आश्वासनानंतर तरुणांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंजाबमधील सोनूच्या मूळगावी मोगा येथे त्याची आई सरोज सूद हिच्या स्मृतिप्रित्यर्थ एका रस्त्याला तिचे नाव देण्यात आले. त्यावेळी सोनू खूपच भावूक झाला होता. तो म्हणतो ही जागा माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण येथून मी शाळेत जायचो, माझे आई-वडील कामावर जायचे. हे दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. त्यामुळे या रस्त्याला माझ्या आईचे नाव दिल्याचा आनंद केवळ अवर्णनीय आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cX814a