Full Width(True/False)

फक्त १० सेकंदात विकले ३३० कोटी रुपयांचे स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः वनप्लस (OnePlus) च्या नवीन स्मार्टफोनने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला आहे. सीरीजच्या स्मार्टफोन्सने नवीन रेकॉर्ड बनवला आहे. अवघ्या १० सेकंदात वनप्लस ९ सीरीजच्या स्मार्टफोनची ३३० कोटी रुपयांची विक्री झाली आहे. वनप्लसने २४ मार्च रोजी चीनमध्ये 9 सीरीज लाँच केली होती. ३० मार्च सकाळी १० वाजता स्मार्टफोन्सचा पहिला सेल पार पडला होता. वाचाः १० सेकंदात विकले ३३६ कोटी रुपयांचे फोन वनप्लसने सांगितले की, पहिल्या सेलमध्ये जवळपास ३०० मिलियन युआन (जवळपास ३३६ कोटी रुपये) चे च्या फोनची विक्री झाली आहे. कंपनीने सांगितले की, OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro मध्ये कोणता स्मार्टफोन सर्वात जास्त विकला गेला आहे. या सेलमध्ये किती स्मार्टफोन्स युनिटची विक्री झाली आहे. चीनमध्ये OnePlus 9 सीरीजसाठी प्री ऑर्डर आधीपासूनच सुरू झाली होती. वाचाः OnePlus 8 सीरीजपेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स एप्रिल २०२० मध्ये वनप्लसने चीनमध्ये OnePlus 8 Series लॉन्च केली होती. पहिल्या सेलमध्ये १ मिनिटात या सीरीजचे जवळपास १०० मिलियन (जवळपास ११२ कोटी रुपये)च्या स्मार्टफोनची विक्री झाली होती. यावेळी वनप्लस ९ सीरीजचे परफॉर्मन्स चांगले आहे. OnePlus ने चीन मध्ये OnePlus 9 सीरीज अंतर्गत OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन लाँच केले आहे. चीनमध्ये OnePlus 9 ची सुरुवातीची किंमत ३,७९९ युआन (जवळपास ४२ हजार ५०० रुपये), तर OnePlus 9 Pro ची सुरुवातीची किंमत ४९९९ युआन (जवळपास ५६,००० रुपये) आहे. वाचाः OnePlus ने चीन मध्ये आपल्या या स्मार्टफोन्सला ColorOS 11 सोबत लाँच केले आहे. वनप्लस ९ ला ८ जीबी आणि १२ जीबी रॅम सोबत लाँच केले आहे. या स्मार्टफोनला २५६ जीबी पर्यंत स्टोरेज सोबत आणले आहे. OnePlus 9 Pro ला 12GB पर्यंत 256GB पर्यंत स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. OnePlus 9 Series शिवाय कंपनी ने चीन मध्ये आपली पहिली स्मार्टवॉच OnePlus Watch (क्लासिक एडिशन) लाँच केले आहे. चीनमध्ये याची किंमत ९९९ युआन म्हणजेच ११ हजार २०० रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sydd5f