Full Width(True/False)

करोनाचे नियम मोडणाऱ्या गौहर खानवर FWICEकडून मोठी कारवाई

मुंबई: करोनाने ग्रासले असले तरीही चित्रीकरणात भाग घेण्याचा उत्साह अभिनेत्री हिला महागात पडला आहे. मुंबई पालिकेने तिच्याविरोधात तातडीने कारवाई करत ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. ओशिवरा परिसरात राहणाऱ्या गौहर खानने चाचणी केली होती. त्याचा अहवाल ११ मार्च रोजी आला असता त्यात तिला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा तिला घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्बंध लागू होता. असे असतानाही गौहर खान हिने विलगीकरणाचा नियमभंग करत थेट चित्रीकरणात सहभाग घेतला. पालिकेच्या आरोग्य विभागाने तिच्या घरी जाऊन झाल्या प्रकारची शहानिशा करण्यात आली. त्यांनतर पालिकेच्या के-पश्चिम विभागातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज () नं गौहर खानच्या या निष्काळजीपणाची दखल घेऊन मोठी कारवाई केली आहे. गौहरवर दोन महिन्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय FWICEनं घेतला आहे. गौहर खानच्या टीमकडून स्पष्टीकरणगौहरच्या टीमनं एक पत्राक जाहीर केलं आहे. 'गौहर नियम आणि कायद्याला धरून चालणारी आणि त्यांचं पालन करणारी एक जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे याप्रकरणी वेगवेगळे अंदाज बांधणाऱ्यांना विनंती आहे की हे प्रकरण आणखी वाढवण्याचा प्रयत्न करू नका. गौहर तिच्याकडून अपेक्षित असलेलं सर्व सहकार्य मुंबई महानगरपालिकेला करणार आहे.' असा विश्वास टीमच्या स्टेटमेंटमार्फत देण्यात आला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38N4Kn0