मुंबई- बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे स्टाइलिश फोटो पाहून चाहतेदेखील तिचं कौतुक करतात. लिसा सध्या तिच्या तिसऱ्या बाळंतपणाचा आनंद घेत आहे. ती लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. लिसाला दोन मुलं आहेत आणि आता ती येणाऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहे. त्यासाठी तिने नवीन घरदेखील खरेदी केलं आहे. त्या घरातील इंटेरिअर तिने स्वतः केलं आहे. याबद्दल तिने तिच्या इंस्टाग्रामवर माहिती दिली होती. यावेळेस लिसाने तिचे बिकिनीमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. लिसाने समुद्र किनाऱ्यावरील बिकिनीमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. त्यात ती अत्यंत आकर्षक दिसत आहे. या फोटोंमध्ये तिचं पोटदेखील दिसत आहे. मोठी टोपी घालून ती किनाऱ्यावर बसली आहे. तिने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला. त्यांनी तिचं कौतुक केलं. काही नेटकऱ्यांनी तिला तिच्या फिटनेस मागील रहस्य विचारलं. तर काहींनी तिच्या त्वचेचं कौतुक केलं आहे. त्यांनी तिला तिच्या वजनाबद्दलही विचारणा केली आहे आणि गरोदरपणातही वजन न वाढल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. महत्वाचं म्हणजे नेटकऱ्यांनी लिसाला तिच्या पोटावरील खुणांबद्दल विचारलं. लिसाच्या पोटावर पूर्वीच्या बाळंतपणाच्या कसल्याच खुणा न दिसल्याने त्यांनी तिला तिच्या स्किन केयर रुटीनबद्दल विचारलं. अभिनेत्री नर्गिस फाकरीने तिच्या पायांचं कौतुक करत लिहिलं, 'उफ्फ हे पाय.' हे फोटो तिच्या नवऱ्याने काढले असून तिने तिच्या तिसऱ्या गरोदरपणाची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. एक व्हिडीओ पोस्ट करत तिने तिच्या दोन मुलांसाठी एक बहीण येत असल्याचा खुलासा केला होता. x
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rssCmo