मुंबई: बॉलिवूड अभिनेता याचा आज ४६ वा वाढदिवस. एकेकाळी अक्षय खन्ना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जात असे. 'दिल चाहता है', 'रेस' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेला अक्षय खन्ना सध्या मात्र चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. अक्षय सध्या कोणत्याच चित्रपटात दिसत नसला तरी त्यानं आतापर्यंत जे चित्रपट केले ते उल्लेखनीय होते. तसेच या अभिनेत्यानं आजपर्यंत लग्न केलेलं नाही. पण का? हा असा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर अद्याप कोणाला मिळालेलं नाही. अक्षय खन्ना शेवटचा 'सेक्शन ३७५' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री ऋचा चढ्ढा सुद्धा मुख्य भूमिकेत होती. पण अक्षयच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. 'हिमालय पुत्र' या त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यानंतर त्यानं अनेक चित्रपटात काम केलं आणि अनेक पुरस्कारही जिंकले. मीडिया रिपोर्टनुसार अक्षय खन्नाचं लग्न अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत होणार होतं. पण हे लग्न होऊ शकलं नाही. रणधीर कपूर यांनी त्यांची मुलगी करिश्माचं लग्न विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत ठरवलं होतं. पण करिश्माची आई बबिता कपूर यांना मात्र हे लग्न मान्य नव्हतं. करिश्माच्या करिअरवर कोणत्याही प्रकारचं बंधन येऊ नये असं बबिता यांना वाटत होतं. त्यामुळे अक्षय आणि करिश्माचं लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर करिश्मानं बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं पण अक्षय मात्र अद्याप अविवाहितच आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PBBE2W