मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेते यांना नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यांचा मुलगा यानं त्यांच्यावतिनं हा पुरस्कार स्वीकारला. बाबिलनं या पुरस्कार सोहळ्यात वेगळीच छाप पाडली. त्याचंही सध्या कौतुक होत आहे. या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावताना बाबिलनं वडिलांचे म्हणजेच इरफान यांचेच कपडे परिधान केले होते. या सोहळ्यादम्यान आलेल्या एका प्रसंगावर बाबिलनं सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केलं आहे. काय घडलं नेमकं?पुरस्कार सोहळ्यादरम्यान तिथं उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी बाबिला असा काही प्रश्न विचारला की, तो संतापला. त्यानं त्याचा संताप सोशल मीडियावर व्यक्त केला. बाबिलंन इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीए. त्यात त्यानं हा प्रसंग शेअर केलाय. 'मला तुम्हा सर्वांना एका प्रसंगाबद्दल सांगायचं आहे. मी नुकतीच फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या सोहळ्यादरम्यान तिथं असलेल्या सात पत्रकारांनी मला पिऊन आयाल का? असा प्रश्न विचारला. असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे माझे डोळे. झाला लुक. भारीच हा मित्रांनो,खूपच चांगला शोध लावला तुम्ही. युनिव्हसिटी सोडली तेव्हापासून मी पूर्णपणे नॅचरल आहे. माझा हा नॅचरल लुक तुम्हाला नशेत असल्यासारखा वाटतोय, हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! हाच माझा चेहरा आता मी बॉलिवूडमध्ये वापरून कोट्यवधी रुपये कमवणार आहे', अशी जळजळीत पोस्ट बाबिलनं लिहिली आहे. दरम्यान, बाबिल खाननं फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दिवंगत वडील इरफान खान यांचे दोन पुरस्कार स्वीकारले. इरफान यांना 'अंग्रेजी मीडियम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यासोबतच त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारानंसुद्धा सन्मानित करण्यात आलं. अलिकडच्या काळातच बाबिलनं खुलासा केला की, त्याला आपल्या वडिलांप्रमाणे अभिनेता व्हायचं आहे. सध्या बाबिल भाऊ अयानसोबत एका म्यूझिक अल्बमवर काम करत आहे. पण यासोबत त्याला वडिलांची अभिनयाची परंपरासुद्धा पुढे न्यायची आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31tEqKB