मुंबई- अभिनेत्री अलिकडेच कलर्स वाहिनीवरच्या '' या कार्यक्रमात पाहुणी कलाकार म्हणून गेली होती. सान्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत स्वतःचा असा चाहता वर्ग तयार केला आहे. या कार्यक्रमात आल्यानंतर सान्याने सहा वर्षांपूर्वीची एक आठवण सांगितली. ती आठवण ऐकून धर्मेश आणि माधुरी दीक्षितही आश्चर्यचकीत झाले होते. धर्मेशने केले होते रिजेक्ट डान्स इंडिया ३ या कार्यक्रमात सान्या पाहुणी म्हणून आली असताना तिने तिच्या स्ट्रगलच्या आठवणी सांगितल्या. या स्ट्रगलच्या काळामध्ये परीक्षक असलेल्या एका डान्स शोमध्ये ती सहभागी झाली होती. परंतु त्यावेळी तिची निवड केली नव्हती. त्याबाबत सान्याने सांगितले की, 'आज माझ्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. सहा वर्षांपूर्वी याच स्टुडिओमध्ये एका डान्स शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. परंतु त्यावेळी मी ऑडिशन पास करू शकले नव्हते.' 'त्या कार्यक्रमात धर्मेशच परीक्षक होते आणि त्यांनीच मला रिजेक्ट केले होते. हे सगळे झाले तेव्हा रात्रीचा १ वाजला होता. आता याच स्टुडिओमध्ये धर्मेशच परीक्षक असलेल्या कार्यक्रमात मी आज माझ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले आहे.' हे सगळे ऐकल्यावर या शो चे जज धर्मेश, माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया देखील आश्चर्यचकीत झाले. तू आता सर्वांसाठी प्रेरणा झालीस सान्या मल्होत्राने जे काही सांगितले त्यानंतर धर्मेशला नेमके काय बोलावे हेच कळत नव्हते. तो म्हणाला, 'सान्या त्यानंतर तू जे यश मिळावले आहे, त्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन. सान्याचा हा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा. नकार मिळाल्यानंतरही तिने हार न मानता जिद्दीने आपला प्रवास पुढे सुरू ठेवला आणि तिने आज जे यश मिळवले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे.' दरम्यान, अभिनेत्री सान्या मल्होत्राने अभिनय केलेले सर्वच सिनेमे हिट झाले आहेत. २०१६ मध्ये तिचा पहिला सिनेमा 'दंगल' प्रदर्शित झाला. तुफान यश मिळालेल्या या सिनेमात सान्याने बबिता कुमारीची भूमिका साकारली होती. त्यानंतर २०१९ मध्ये आलेल्या 'बधाई हो' या सिनेमात रीना शर्मा ही भूमिका केली होती. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शकुंतला देवी' या सिनेमात तिने अनुपमा बॅनर्जी ही भूमिका वठवली होती. तर 'ल्युडो' सिनेमात श्रृती चोक्सी ही भूमिका साकारली होती. अलिकडेच तिचा 'पगलैट' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. आगामी काळात सान्याचे 'मिनाक्षी सुंदरेश्वर' आणि 'लव्ह होस्टेल' हे दोन सिनेमे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m5M1Zd