Full Width(True/False)

बॉयफ्रेण्डसोबत लिव्हइनमध्ये राहण्यावर आईची होती 'ही' प्रतिक्रिया; अनन्या पांडेच्या बहिणीचा खुलासा

मुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनन्या पांडेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिच्या स्टाईलने तिने चाहत्यांवर जादू केली. अनन्याप्रमाणेच तिची बहीण अलानादेखील सोशल मीडियावर चर्चेत असते. अलाना एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे निरनिराळ्या पोज मधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर अलानाचे लाखो चाहते आहेत. त्याशिवाय अलानाचा एक युट्यूब चॅनेल देखील आहे. त्या चॅनेलवर अलानाने चाहत्यांनी विचारलेल्या तिच्या आयुष्यातील काही खाजगी प्रश्नांना उत्तर दिली आहेत. अलाना तिच्या बॉयफ्रेण्डसोबत लिव्ह इन मध्ये राहते. अलानाच्या युट्यूब चॅनेलवर चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले त्यात काहींनी तिच्या लिव्ह इन मध्ये राहण्याबद्दल तिच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया विचारल्या. चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ती म्हणाली, 'मला आठवतं मी सगळ्यात आधी माझ्या आईला याबद्दल सांगितलं होतं की मी लिव्ह इन मध्ये राहणार आहे. हे ऐकून माझी आई खूप आनंदित झाली होती. कारण आम्ही स्वतःचं घर घेणार होतो. हे माझं पहिलं घर होतं जे मी स्वतः खरेदी करणार होती. मी घरातला माझा हिस्सा देणार होती त्यामुळे हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता.' अलाना ही अनन्याच्या काकांची मुलगी आहे. अलानाची आई एक हेल्थ कोच आहे. जेव्हा अलानाला विचारण्यात आलं की, लिव्ह इन मध्ये राहण्यासाठी घरातून कुणाचा विरोध झाला का? त्यावर अलानाने म्हटलं, 'मी हे यापूर्वीच सांगितलं आहे की माझ्या घरातले खूप पुढारलेल्या विचारांचे आहेत. फक्त बॉयफ्रेण्डसोबत राहण्यासाठीच नाही तर मला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी त्यांची मनधरणी करावी लागली नाही.' अलाना तिच्या बॉयफ्रेण्डसोबत मागील एक वर्षापासून आहे. अलाना तिच्या बॉयफ्रेण्डच्या सगळ्या कुटुंबाला भेटली आहे. सध्या ती तिच्या बॉयफ्रेण्डसोबत मुंबईत आहे. तिने सोशल मीडियावर त्यांचे धुळवड खेळतानाचे फोटोही शेअर केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wgkVmD