Full Width(True/False)

बॉयफ्रेंडने केलेल्या शायरीवर काय म्हणाली सुश्मिता सेन? चाहत्यांनीही व्यक्त केल्या प्रतिक्रिया

मुंबई ः सुष्मिता सेन नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच वैचारिक अशा पोस्ट करत असते. सुष्मिता हिला देखील शेरो-शायरी आवडतात. आता तिचा बॉयफ्रेंड हा देखील शेरोशायरी पोस्ट करू लागला आहे. अलिकडेच रोहमन शॉलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका झाडाचा फोटो पोस्ट करत त्याला अनुरूप अशी शायरीही त्याने पोस्ट केली आहे. त्याच्या या शायरीला सुश्मिताने लाईक करत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर रोहमन याने ही मजेशीर असे उत्तर दिले आहे. रोहमन शॉल याने इन्स्टाग्रामवर फोटोबरोबर ' उस वक्त, उस जगह, जहाँ मुझे लगा मैं अकेला हूँ, वहाँ मुझे इस पेड का साथ मिला!! इसे अब मैंने कर लिया है, और अकेलपन से रिश्ता गैर कर लिया है.' रोहमन शॉल याने ही पोस्ट केल्यानंतर लगेचच सुश्मिताने त्यावर लिहिले,'उफ्फ जान! बात तो है' सुष्मिता सेन हिच्या या प्रतिक्रियेवर रोहमन याने लगेचच त्याला उत्तर दिले. तो लिहितो, 'संगत का असर है... ' या पोस्टवर आणि या दोघांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर त्यांचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. रोहमन शॉल आणि हे ब-याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रोहमन हा मॉडेल असून या दोघांची भेट एका फॅशन शोमध्ये झाली होती. रोहमन हा मूळचा च्या नोएडा येथील असून मॉडेलिंगमध्ये करीअर करण्यासाठी म्हणून तो २०१४ मध्ये मुंबईला आला. रोहमन याने मॉडेलिंग शिवाय हिअर मी, लव मी या वेबसीरिजमध्येही काम केले होते. सुश्मिता सेन हिने राम माधवानी यांच्या ‘आर्या’ या वेबसीरिजमध्ये काम केले होते. ही बेवसीरिज डिस्ने आणि हॉटस्टारवर रिलीज झाली होती. या वेबसीरिजमध्ये सुश्मिताची मुख्य भूमिका होती. या वेबसीरिजचे खूप कौतुक झाले होते. या सीरिजचा पुढचा भागाचे चित्रिकरण सुरू असून सुश्मिता त्यात व्यग्र आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u9hah3