Full Width(True/False)

शाहरुखने गौरीला बुडवलं पाण्याच्या हौदात, जुना व्हिडीओ व्हायरल

मुंबई- बुरा न मानो होली है, म्हणत दरवर्षी बॉलिवूडमध्ये रंगपंचमी खूप उत्साहात साजरी केली जाते. अनेक दिग्गज कलाकारांच्या आणि दिग्दर्शकांच्या घरी रंगपंचमीसाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमात अनेकांना आमंत्रण दिलं जातं. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांच्या घरी अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. शिवाय आपल्या आवडत्या कलाकारांना धुळवड साजरी करताना बघण्याची संधीही चाहत्यांना मिळणार नाही. अशातच अभिनेता याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखने त्याची पत्नी गौरी खानला एका रंगाचं पाणी भरलेल्या हौदात बुडवल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ २००० साली घई यांनी ठेवलेल्या रंगपंचमीच्या पार्टीचा आहे. ही पार्टी त्यांनी मढ आयलंडवरील मेघना कॉटेजमध्ये आयोजित केली होती. या पार्टीत शाहरुख खूप जास्त मजा करताना दिसत आहे. सर्वप्रथम तो स्वतः त्या पाण्याने भरलेल्या हौदात उडी मारतो. त्यानंतर गौरीलादेखील उचलून त्या हौदात टाकण्याचा प्रयत्न करतो. ते पाहून गौरी स्वतःच त्या हौदात उतरते. त्यावरही शाहरुख तिला पूर्णपणे हौदातील पाण्यात बुडवतो. नंतर तो तिला हौदातून बाहेर येण्यास मदत करतो. त्यानंतर ते दोघेही गाण्यांच्या तालावर डान्स करताना दिसतात. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींकडे असे कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रसिद्ध निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूरदेखील दरवर्षी अशा समारंभाचं आयोजन करते. अमिताभ यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. त्यात ते इतरांसोबत रंगपंचमी खेळताना दिसत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fngSPr