Full Width(True/False)

Photos: धुळवडीच्या दिवशी साराने दिली पांढऱ्या बिकनीला पसंती

मुंबई- दिवसागणिक करोनाचा उद्रेक वाढत चालल्यामुळे होळी आणि धुळवड सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असले तरी अनेक सेलिब्रिटी आपापल्या घरात राहूनच रंगांचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेताना दिसत आहेत. या सगळ्यामध्ये सध्या सोशल मीडियावर हिने साजऱ्या केलेल्या होळी सेलिब्रेशनच्या फोटोंची जोरदार चर्चा आहे. सारा अली खान सोशल मीडियावर सक्रीय असून, वेगवेगळ्या मूडमधले, वेगवेगळ्या अंदाजातील फोटो- व्हिडीओ ती सतत आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने होळी आणि धुळवडीचे सेलिब्रेशन आपल्या वडिलांसोबत सोबत केले. यावेळी करिना कपूरसह त्यांच्या घरातील जवळची मंडळी या सेलिब्रेशनला उपस्थित होती. सर्वांनी मिळून होळीचं धम्माल सेलिब्रेशन केले. त्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती साराच्या दोन फोटोंची. या फोटोमध्ये सारा स्विमिंग पूलमध्ये दिसत असून तिने पांढऱ्या रंगाची बिकनी घातली आहे. गॉगल घातलेल्या साराच्या हातात ड्रिंक आहे. यामध्ये सारा एकदम कूल लुकमध्ये दिसत आहे. दरम्यान, साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना हटके स्टाइलमध्ये होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओत सारा 'रंग बरसे...' गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. तिचा हा व्हिडीओ देखील खूप व्हायरल झाला आहे. साराचे आगामी सिनेमे सारा अली खान 'कुली नंबर १' मध्ये वरूण धवन बरोबर दिसली होती. त्यानंतर तिचा कोणताही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. नुकतंच तिने आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुष आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m21pWj