Full Width(True/False)

'किती किंमत मोजली?', फिल्मफेअर अवॉर्डनंतर अलायावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा

मुंबई: अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी हिने मागच्या वर्षी 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अलायाला नुकत्याच पार पडलेल्या ६६ व्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात पदार्पणचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. अलायानं या ट्रॉफीसोबतचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. मात्र या अवॉर्डमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. अलायाला फिल्मफेअरचा पदार्पणचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर अलाया खूप खुश आहे. तिनं सोशल मीडियावर या ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, 'ती माझी आहे, बेस्ट डेब्यू फीमेल.' पण या पोस्टनंतर अलायाला सोशल मीडिया युझर्सनी जोरदार ट्रोल केलं आहे. अलायाला फिल्मफेअर मिळाल्याबद्दल सोशल मीडिया युझर्सनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं, 'मी यासाठी खूप खुष आहे. सर्वांचे खूप खूप आभार मी वचन देते की मी या पेक्षाही जास्त मेहनत करेन आणि स्वतःचे सर्वोत्तम प्रयत्न करेन. ज्याने तुम्हा सर्वांना माझा अभिमान वाटेल.' पण ही पोस्ट करणं अलायाला खूप महागात पडलं आहे. अलायाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. काही युझर्सनी तर तिला सरळ सरळ हा अवॉर्ड किती पैसे देऊन खरेदी केला आहेस असं विचारलं आहे. एका युझरनं म्हटलं, तुझा चित्रपट कधी रिलीज झाला होता. तर आणखी एका युझरनं हिना खान 'हॅक्ड'साठी हा पुरस्कार मिळायला हवा होता असं म्हटलं आहे. याशिवाय अनेकांनी नेपोटिझमच्या मुद्द्यावरूनही अलायाला ट्रोल केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cCtWyT