मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना ओळखीची गरज नाही. तिने तिच्या कामाने भल्याभल्यांची बोलती बंद केली आहे. डिस्नी हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या 'आर्या' या वेबसीरिजमधील तिच्या अभिनयासाठी प्रेक्षकांनी तिचं प्रचंड कौतुक केलं होतं. तिने पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केल्याचं बोललं जात होतं. सुष्मिताला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पत्रकारांसमोर बोलणं मुळीच पसंत नाही. ती तिच्या आयुष्यातील अनेक घटना चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. नुकतीच सुष्मिताने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. ती पाहून तिचे चाहतेही हैराण झाले आहेत. सुष्मिताने चाहत्यांसोबत भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलं, 'आयुष्यात अनेकदा असं होतं जेव्हा आपण स्वतःला सावरू शकत नाही किंवा स्वतःला अशा नात्यामध्ये आणखीनच गुंतत जाताना बघतो जे नातं आपल्याला आणखी दुःख आणि अश्रू देणार आहे. किंवा असं नातं जे आपल्या दुःखाला आणि जखमेला स्पर्शसुद्धा करत नाही. आपण या दोन्हीपैकी एका रस्त्याची निवड करतो. आपलं काम आहे स्वतःला सांभाळणं. स्वतःला जागरूक करणं. हा रस्ता आपल्याला योग्य व्यक्तींपर्यंत घेऊन जातो. हा रस्ता आपल्यासाठी योग्य ठरतो. त्यातून आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो.' या पोस्टसोबत सुष्मिताने कॅप्शनही दिलं आहे. तिने लिहिलं, 'आपल्याबरोबर एकचं घटना पुन्हा पुन्हा घडत राहते जोपर्यंत आपण तिला घडण्यापासून थांबवत नाही. मी माझ्या अनुभवातून सांगतेय, आपल्या प्रत्येकात स्वतःला जागृत करण्याची शक्ती आहे. जेव्हा आपल्याला आपल्यासाठी वाईट ठरणाऱ्या आणि पुन्हा पुन्हा घडणाऱ्या गोष्टींची जाणीव होते. तेव्हा त्या गोष्टी वेळेवर थांबवल्या गेल्या पाहिजेत नाहीतर त्या आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात.' सुष्मिताच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्या कणखरतेचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला सगळं ठीक आहे ना? अशी विचारपूस केली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुष्मिता आणि तिच्या बॉयफ्रेण्डच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. परंतु, सुष्मिताने त्यासंबंधी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m7ZqA7