Full Width(True/False)

boAt, Realme, Amazfit कंपन्यांची स्मार्टवॉच अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

नवी दिल्लीः जर तुम्हाला नवीन स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आहे. Vijay Sales च्या ऑनलाइन वेबसाइट वर Smart Watches Fest चे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल ११ मार्च पासून सुरू झाला असून १८ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये Realme, Amazfit, boAt, Mi, Lenovo सह अनेक कंपन्याचे वॉचेस आणि बँड्स उपलब्ध आहे. वाचाः boAt Storm Smart Watch (Active Black) RTL: यीची एमआरपी किंमत ५ हजार ९९० रुपये आहे. याला ५७ टक्के डिस्काउंटसोबत २५९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. स्टँडर्ड ईएमआय जर युजर घेत असेल तर त्यांना कमीत कमी ईएमआय १२३ रुपये प्रति महिना राहिल. हे २४ महिन्यासाठी राहिल. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १.३ इंचाचा फुल टच डिस्प्ले दिला आहे. यात २.५ डी कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. तसेच यात हेल्थ आणि फिटनेस मॉनिटरींग फीचर दिले आहेत. बॅटरी ८ ते १० दिवस आहे. वाचाः Fire-Boltt Full Touch Smart Watch: याची एमआरपी किंमत ५९९९ रुपये आहे. यावर ५० टक्के डिस्काउंट सोबत २ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. यात १.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. यात हार्ट रेट, फिटनेस आणि स्पोर्ट्स मोड दिले आहेत. यात SPO2 फंक्शन सह ब्लड प्रेशर मॉनिटर दिले आहे. या स्मार्टवॉचचा स्टँडबाय टाइम ३६० तास आहे. यात वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्कीपिंग, बॅटमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल सारखे स्पोर्ट्स मोड दिले आहेत. हे IPX6 वॉटर रेस्सिटेंट आहे. वाचाः RealMe RMA161 1st Gen Fashion Strap Smart: याची MRP ६,९९९ रुपये आहे. यावर ५० टक्के डिस्काउंट सोबत ३ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. यात १.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. यात कलर टचस्क्रीन डिस्प्ले सोबत ब्लड ऑक्सिजन लेवल मॉनिटर दिले आहे. वाचाः Amazfit Bip U Smart Watch: याची MRP ५ हजार ९९९ रुपये आहे. यावर ३३ टक्के डिस्काउंट सोबत ३ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. स्टँडर्ड ईएमआय घेतल्यास १९० रुपये प्रति महिना २४ महिन्यात स्मार्टवॉच खरेदी करू शकता. यात १.४ इंचाचा लार्ज कलर टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे. यात ब्लड ऑक्सीजन लेवल मेजरमेंट दिला आहे. यात हार्ट रेट मॉनिटर दिले आहे. तसेच कॉर्निंग गोरीला ग्लास ३ प्रोटेक्शन दिले आहे. यात ६० हून जास्त स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bPOPpO