Full Width(True/False)

करोना प्रकरणी गौहर खाननं सोडलं मौन, हात जोडून म्हणाली..

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मागच्या काही दिवसांपासून कठीण काळातून जात आहे. काही दिवसांपूर्वीच गौहरच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर लगेचच तिला नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गौहर खान करोना पॉझिटिव्ह असतानाही तिनं शूटिंग चालूच ठेवलं आणि करोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. ज्यासाठी सोमवारी तिच्याविरोधात एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत गौहर खाननं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता मात्र तिच्या टीमकडून गौहरच्या वतीनं एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे. अभिनेत्री गौहर खानच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं करोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती. या प्रकरणी आता गौहर खानवतीनं तिच्या टीमकडून एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे. ज्यात त्यांनी गौहर खानची करोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. यासोबतच हे प्रकरणी आणखी न वाढवता गौहरला काही काळासाठी एकटं सोडण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे. गौहरच्या टीमनं हे स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, 'गौहर नियम आणि कायद्याला धरून चालणारी आणि त्यांचं पालन करणारी एक जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे याप्रकरणी वेगवेगळे अंदाज बांधणाऱ्यांना विनंती आहे की हे प्रकरण आणखी वाढवण्याचा प्रयत्न करू नका. गौहर तिच्याकडून अपेक्षित असलेलं सर्व सहकार्य मुंबई महानगरपालिकेला करणार आहे.' असा विश्वास टीमच्या स्टेटमेंटमार्फत देण्यात आला आहे. या दरम्यान गौहर खानच्या टीमनं मीडियाला सुद्धा विनंती केली आहे की, 'हा मुद्दा त्यांनी इथंच सोडून द्यावा. कारण काही दिवसांपूर्वीच गौहरनं आपले वडील गमावले आहेत. मागच्या काही दिवसांपासून ती स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थिती यावर अधिक चर्चा करणं योग्य नाही. तिला तिचे प्रश्न स्वतःला सोडवण्यासाठी वेळ द्या.' यासोबतच टीमनं गौहरच्या टेस्टचा रिपोर्ट सुद्धा शेअर केला आहे. ज्यात तिची टेस्ट निगेटीव्ह आल्याचं सांगण्यात आलं आहे. गौहरच्या टीमनं तिचं स्टेटमेंट देताना म्हटलं आहे की, 'हात जोडून विनंती आहे की, यावेळी गौहरला एकटं सोडा. ती स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे आणि मुंबई महानगरपालिकेला अपेक्षित असलेलं सहकार्य सुद्धा करत आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bQqEYf