Full Width(True/False)

सरकारी स्कीमसह Google वर चुकूनही या ५ गोष्टी सर्च करू नका, कुणालाही विचारा, पण...

नवी दिल्लीः Google Search करा. असं तुम्हाला कोणीही सांगेल परंतु, काही गोष्टी गुगलवर सर्च न करणे हे फायद्याचे आहे. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. आज आपल्याला काहीही माहिती हवी असेल तर आपण पटकन गुगलवर सर्च करतो. गुगल सर्चमध्ये आपल्याला ती माहिती अवघ्या एका सेकंदात मिळते. परंतु, काही सर्चिंग हे धोक्याचे ठरू लागले आहेत. जाणून घ्या या संबंधी. वाचाः बँक अकाउंट जर तुम्ही ऑनलाइन बँकिंग करीत असाल तर यासंबंधीची माहिती चुकूनही गुगलवर शोधण्याच्या भानगडीत पडू नये. सध्या बँकिंग फ्रॉडची मोठी भीती निर्माण झाली आहे. सायबर गुन्हेगार यासाठी टपून बसलेले आहेत. दिसायला एकदम बँकेसारखीच माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देतात. परंतु, ते बँकिंग डेटा चोरी करू शकतात. तुमचे बँक खाते सुद्धा रिकामे करू शकतात. वाचाः कस्टमर केयर गुगल सर्चवर चुकूनही कोणाचाही कस्टमर केयरचा नंबर सर्च करू नये. सायबर क्रिमिनल या ठिकाणी तुम्हाला चुकून कस्टमर केयर नंबर देऊन तुमची आवश्यक माहिती चोरी करू शकतात. ही माहिती चोरी केल्यानंतर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची भीती असते. अॅप्स किंवा सॉफ्टवेयर मोबाइल अॅप्स आणि सॉफ्टवेयर तुमचे आयुष्य सोपे बनवण्याचे काम करीत असते. परंतु, अनेकदा सायबर गुन्हेगार मिळते जुळते अॅप्स आणि सॉफ्टवेयर मध्ये टाकत असतात. त्याला तुम्ही डाउनलोड केल्यानंतर त्यातून ते तुमची पर्सनल माहिती चोरी करू शकतात. तसेच यामुळे फोनमध्ये किंवा कंप्यूटरमध्ये वायरसचा धोका निर्माण होऊ शकतो. वाचाः सरकारी स्कीम सरकारी स्कीम गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. कारण, हे प्रकरणे हल्ली खूप वाढली आहेत. सरकारी स्कीमसंबंधी अनेकांना फारशी माहिती नसते. याचा गैरफायदा काही लोक घेत असतात. अधिकृत साइट्स वर जाऊन सरकारी स्कीमची माहिती घेणे कधीही चांगले आहे. कूपन कोड ऑनलाइन शॉपिंग दरम्यान अनेकदा कूपन कोड द्वारे डिस्काउंट दिले जातात. परंतु, अनेकदा फ्री कूपन कोडसाठी गुगलवर सर्चिंग केले जाते. एक्स्पर्ट्सच्या माहितीनुसार, कूपन कोड शोधण्यासाठी गुगर सर्चची मदत घेणे धोक्याचे ठरू शकते. सायबर क्रिमिनल फेक कूपन कोड टाकून त्यातून तुमची फसवणूक करण्यासाठी बसलेले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sPGW9J