मुंबई: याच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणाची चौकशी सुरू असताना अनेक सेलिब्रेटींची नाव समोर आली होती. या प्रकरणात आता बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता याचं नावही जोडलं गेलं आहे. तसं पाहायला गेलं तर वादात सापडण्याची एजाज खानची ही पहिली वेळ नाही. पण यावेळी ड्रग्स प्रकरणात एजाजला ने अटक केल्यानं त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. जाणून घेऊयात एजाज खान विषयी इतर काही गोष्टी... गुजरातच्या अहमदाबाद येथे २९ मे १९८१ रोजी जन्मलेल्या एजाज खाननं टीव्ही विश्वातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. २००७ मध्ये आलेली टीव्ही मालिका 'क्या होगा निम्बो का'मधून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं 'रहे तेरा आशिर्वाद', 'Ssshhhh... कोई है', 'कहानी हमारे महाभारत की', 'मट्टी की बन्नो', 'दीया और बाती हम' या सारख्या मालिकांमध्ये काम केलं. २०१३ मध्ये तो बिग बॉस ७ चा स्पर्धक होता. या शोचा फर्स्ट रनरअप सुद्धा झाला. त्यानंतर त्यानं 'खतरों के खिलाडी ५' मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री केली होती. तसेच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही एजाज खाननं काम केलं आहे. एजाज खानच्या बॉलिवूड करिअरबद्दल बोलायचं तर २००९ मध्ये रिलीज झालेल्या 'Ek: The Power of One' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो 'लम्हा', 'अल्लाह के बंदे', 'रक्त चरित्र 2', 'बुड्ढा होगा तेरा बाप', 'बादशाह', 'हार्ट अॅटॅक' आणि 'टेंपर' या चित्रपटांमध्ये दिसला. तसेच २०२०मध्ये त्याचा चित्रपट 'गुल मकाई' रिलीज झाला होता. एजाजच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं तर त्यानं अँड्रिया खानशी लग्न केलं होतं आणि या दोघांनी अॅलेक्झँडर नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे एजाज एजाज खान वादात सापडण्याची किंवा अटक होण्याची ही पहिली वेळ नाही याआधीही २०१८ मध्ये त्याला ड्रग्स प्रकरणात NCB नं अटक केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये सोशल मीडियावरून आक्षेपार्ह आणि समाजात फूट पाडणाऱ्या पोस्ट केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. मागच्या तीन वर्षांत होण्याची ही तिसरी वेळ आहे. ड्रग्स पेडलर शादाब बटाटा याला अटक झाल्यानंतर या प्रकारणात एजाज खानचंही नाव समोर आलं. मंगळवारी ३० मार्चला राजस्थानवरून मुंबईला परतल्यानंतर एजाज खानला अटक करण्यात आली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3waYTlo