नवी दिल्लीः पोकोने आज भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन पोकोचा फोन गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या पोको एक्स३ चे अपग्रेड व्हर्जन आहे. पोको एस ३ प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६० प्रोसेसर, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा डिस्प्ले यासारखे खास फीचर्स या फोनमध्ये दिले आहेत. पोको एक्स ३ प्रो स्मार्टफोनची किंमत, त्याची खास फीचर्स आणि सर्वकाही जाणून घ्या. वाचाः Poco X3 Pro: किंमत आणि ऑफर पोको एक्स ३ प्रो च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १८ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. फोन गोल्डन ब्राँज, ग्रेफाइट ब्लॅक, आणि स्टील ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. फोनला १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकणार आहे. पोको एक्स ३ प्रोला ICICI बँक क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय ट्रान्झॅक्शनद्वारे खरेदी केल्यास १० टक्के डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. पोको एक्स प्रो सोबत पोको इंडियाने पोको एक्स ३ च्या किंमतीत कपात केली आहे. हा फोन आता १६ हजार ९९९ रुपयाऐवजी १४ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः Poco X3 Pro: फीचर्स पोको एक्स ३ प्रो मध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस (1080x2400 पिक्सल) डॉटडिस्प्ले दिला आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो २०.९ आणि रिफ्रेश रेट हर्ट्ज दिला आहे. डिस्प्लेचा टच सँपलिंग रेट २४० हर्ट्ज आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ६ दिला आहे. पोको एक्स ३ प्रो मध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६० प्रोसेसर आणि ग्राफिक्स साठी अड्रेनो 640GPU दिला आहे. हँडसेट मध्ये ६ जीबी व ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. वाचाः या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हँडसेट सोबत ४८ मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5160mAh ची बॅटरी सोबत ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31JI5UN