
मुंबई- मागील वर्षीपासून सुरु असलेल्या करोना महामारीमुळे बॉलिवूडमध्ये रंगपंचमीचा कोणताही समारंभ आयोजित करण्यात आलेला नाही. प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या घरी राहून कुटुंबासोबत धुळवड साजरी केली आहे. परंतु, अशीही एक वेळ होती जेव्हा बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार एकाच जागी जमायचे आणि या सणाचा मनमुराद आनंद लुटायचे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा त्यांच्या स्टुडिओमध्ये रंगपंचमीचा मोठा समारंभ आयोजित करायचे. अनेक मोठमोठ्या कलाकारांना बोलावणं पाठवलं जायचं. परंतु, आता ना राज कपूर आहेत ना त्यांनी आयोजित केलेला रंगपंचमीचा सोहळा. राज कपूर यांच्या वडिलांनी म्हणजेच पृथ्वीराज कपूर यांनी ही परंपरा सुरू केली होती. परंतु, आर.के. स्टुडिओच्या रंगपंचमीची बातच काही और होती. या सोहळ्यात धम्माल नाचगाणी असायची. अनेक कलाकार त्यांचं वय विसरून या समारंभात सहभागी व्हायचे. रुसवे फुगवे विसरून एकमेकांना रंग लावायचे. एकमेकांना प्रेमाने जवळ घ्यायचे. धम्माल करायचे. हा सोहळा मीडियावर नेहमी चर्चेत असायचा. या सोहळ्याला कलाकारांशिवाय इतर मित्रमंडळी आणि राजकारणीदेखील उपस्थित असायचे. राज या समारंभात खूप आनंदाने नाचायचे आणि गायचे देखील. तेथे एक रंगाच्या पाण्याने भरलेला हौददेखील असायचा. जो समारंभाला हजेरी लावेल त्याला त्या हौदात टाकलं जायचं. राज यांच्या या समारंभात स्वतः भांग बनवायचे आणि दरवर्षी ही जबाबदारी त्यांच्याकडेच असायची. यांनी या समारंभात एक गाणं गायलं होतं जे यश चोप्रा यांनी त्यांच्या 'सिलसिला' चित्रपटात वापरलं. ते गाणं होतं 'रंग बरसे.' आजही बॉलिवूडचे जुने कलाकार त्यांच्या या समारंभाच्या आठवणीत हळवे होताना दिसतात.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31xC79o