Full Width(True/False)

BSNL च्या या प्लानमध्ये २८ दिवसांऐवजी आता ६० दिवसाची वैधता, १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः BSNL ने आपल्या युजर्ससाठी जास्तीत जास्त प्लान ऑफर केले आहेत. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या तुलनेत बीएसएनएलचे हे प्लान बेस्ट आहेत. स्वस्त आणि मोठी वैधता देणारे प्लान आहेत. आम्ही तुमच्यासाठी बीएसएनएलचा असा एक प्लान आणला आहे. ज्यात ६० दिवसांची वैधता मिळते. ज्यात तुम्हाला डेली डेटा आणि कॉलिंग सारखे बेनिफिट मिळते. या प्लानमध्ये मिळणारी सुविधा अन्य टेलिकॉम कंपनीच्या तुलनेत जबरदस्त आहे. या प्लानची किंमत फक्त १०८ रुपये आहे. जियो, एअरटेल आणि व्हीआय म्हणजेच वोडाफोन आयडिया इतक्या कमी किंमतीत डेली डेटाचा कोणताही प्लान देत नाही. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः BSNLचा १०८ रुपयांचा प्रीपेड प्लान अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. ज्यात दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल नेटवर्कचा समावेश आहे. अनलिमिटेड कॉलिंग शिवाय, या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा बेनिफिट सुद्धा दिली जाते. दरम्यान, १ जीबी डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होऊन 80Kbps होते. याचाच अर्थ तुम्हाला १०८ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला १ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण ५०० एसएमएसची सुविधा मिळते. याआधी या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळत होती. परंतु, आता टेलिकॉम सेक्टरमध्ये वाढलेली स्पर्धेमुळे कंपनीने या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसांऐवजी ६० दिवस केली आहे. वाचाः बीएसएनएलच्या या प्लानची तुलना दुसऱ्या टेलिकॉम कंपनी सोबत केल्यास जिओच्या या किंमतीत जवळपास १२५ रुपयांच्या प्रीपेड प्लानवरुन येते. ज्यात तुम्हाला केवळ २८ दिवसांची वैधता मिळते. २८ दिवसांची वैधता सोबत तुम्हाला डेली ०.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग व एकूण ३०० एसएमएस फ्री मिळते. तर एअरटेलचा १२९ रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये १ जीबी डेटा २४ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. ज्यात अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस फ्री मिळते. वोडाफोन आयडियाचा १२९ रुपयांचा प्लान आहे. ज्यात २४ दिवसांची वैधता सोबत डेली २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Pgylyo