Full Width(True/False)

Video : इरफान खानच्या कपड्यात बाबिलनं स्वीकारला पुरस्कार

मुंबई: दिवंगत अभिनेता यांचा मुलगा यानं ६६ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. दिवंगत अभिनेते इरफान खान यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी बाबिलनं या सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं दिलेल्या भाषणानंतर सर्वच भावुक झाले. यावेळी त्यानं सांगितलं की, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यानं वडिलांचे कपडे परिधान केले आहेत. तसेच फॅशन शोमध्ये सहभागी होणं बाबांना अजिबात आवडायचं नाही असंही त्यानं यावेळी सांगितलं. बाबिलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याची आई सुतापा सिकदर बाबिलला या पुरस्कार सोहळ्यासाठी तयार करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'आई मला अवॉर्डसाठी तयार करत आहे.' जयदीप अहलावत, राजकुमार राव, आयुष्मान खुराना यांच्यासोबत इरफान खानचा पुरस्कार घेताना दिलेल्या छोट्याशा भाषणात बाबिल म्हणाला, 'मी काही बोलावं अशी ही जागा नाही. लोक नेहमीच म्हणतात की, तुमच्या वडिलांच्या चप्पला तुम्ही वापरू शकत नाही. कारण त्यात तुमचे पाय फिट बसणार नाही. पण कमीत कमी त्यांचे कपडे मात्र मला फिट येतात. मी फक्त सर्वांचे आभार मानू इच्छितो. आमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आणि आम्हा सर्वांना एवढं प्रेम देण्यासाठी.' आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये बाबिलनं लिहिलं, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो, मी तुमच्या सोबत हा प्रवास करणार आहे आणि मी वचन देतो की, आपण एकत्र मिळून भारतीय चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ. त्यांच्या या कपड्यांमागची कथा अशी आहे की, त्यांना फॅशन शो आणि रॅम्प वॉकमध्ये भाग घेणं अजिबात आवडत नव्हतं पण ते अशा कपड्यांमध्ये अशा शोमध्ये सहभागी होत असत. ज्यामुळे ते त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू शकतील. मी सुद्धा आज अशा ठिकाणी स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे जिथे मला आरामदायी वाटत नाही. जिथे मला कम्फर्टेबल वाटत नाही. बाबिल खाननं ६६ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दिवंगत वडील इरफान खान यांचे दोन पुरस्कार स्वीकारले. इरफान यांना 'अंग्रेजी मीडियम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यासोबतच त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारानंसुद्धा सन्मानित करण्यात आलं. अलिकडच्या काळातच बाबिलनं खुलासा केला की, त्याला आपल्या वडिलांप्रमाणे अभिनेता व्हायचं आहे. सध्या बाबिल भाऊ अयानसोबत एका म्यूझिक अल्बमवर काम करत आहे. पण यासोबत त्याला वडिलांची अभिनयाची परंपरासुद्धा पुढे न्यायची आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rseHNb