मुंबई- बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते खान यांना नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच त्यांच्या 'अंग्रेजी मिडियम' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांच्या या दुहेरी सन्मानाने चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून याचा आनंद सोशल मीडियावरही व्यक्त केला. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान, बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता पहिल्यांदाच इरफान यांच्या मुलाला भेटला. याला भेटल्यानंतर आयुष्मान अत्यंत आनंदित तर झालाच शिवाय तो इरफान यांच्या आठवणीने भावुक देखील झाला. त्याने सोशल मीडियावर इरफान यांच्या आठवणीत एक पोस्टदेखील केली आहे. आयुष्मानने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वांद्रे येथील एका भिंतीवर रेखाटण्यात आलेला इरफान यांचा फोटो शेअर केला. त्या पोस्टवर त्याने लिहिलं, 'ही भिंत वांद्रे येथे कुठेतरी आहे. ते आता शांतपणे आराम करत असतील. त्यांच्या दुहेरी सन्मानाचा आनंद व्यक्त करतोय. सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) आणि जीवनगौरव पुरस्कार!' बाबिलबद्दल बोलताना त्याने लिहिलं, 'माझं हे भाग्य होतं की हा पुरस्कार मी बाबिलला दिला. मी पहिल्यांदाच या मुलाला भेटलो. त्याला भविष्यात चांगलं काहीतरी करताना पाहायचंय. आपण कलाकार वेगळेच असतो. आपल्या स्वतःच्या काही वेदना, कल्पना आणि सिद्धांत असतात. आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवावर विश्वास ठेवतो. आपण जगतो आणि हजारदा मंचावर मरतो पण त्या भूमिकांची शक्ती आपल्याला अमर बनवते.' आयुष्मानने इरफान यांच्यासाठी हिंदीमध्ये कवितादेखील लिहिली, 'कलाकारों का कभी अतीत नहीं होता, कभी वर्तमान नहीं होता। जब भी कोई कलाकार जाता है उसका इस तरह से सम्मान नहीं होता, क्यूंकि हर कोई फनकार इरफान नहीं होता।' आयुष्मानच्या या पोस्टने चाहते भावुक झाले आहेत. बाबिलने देखील या पुरस्काराचे काही फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w6SGXC