Full Width(True/False)

२४९ रुपयांत २ महिने रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० SMS

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने नुकताच २४९ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे. या प्लानमध्ये आता डबल डेटा ऑफर केला जात आहे. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये ग्राहकांना ६० दिवसांची वैधता सोबत रोज २ जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच दोन महिने ग्राहकांना एकूण १२० जीबी डेटा दिला जाणार आहे. तसेच या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS सुद्धा दिले जाणार आहे. हा प्लान कंपनीचा FRC रिचार्ज आहे. नवीन सिम कार्ड घेतल्यानंतर याचा वापर केला जाऊ शकतो. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे २४९ रुपयांच्या प्लानसंबंधी जाणून घ्या सर्वकाही. वाचाः जिओचा २४९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा २४९ रुपयांचा प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. यात केवळ २८ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच ग्राहकांना एकूण ५६ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS सुद्धा दिले जाते. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः Vi चा २४९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडियाचा २४९ रुपयांचा प्रीपेड प्लान असून याची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. याशिवाय, विकेंड डेटा रोलओवर आणि बिंज ऑल नाइट सारख्या सुविधा सोबत Vi Movies & TV Classic चे फ्री अॅक्सेस मिळते. वाचाः एअरटेलचा २४९ रुपयांचा प्लान एअरटेलचा २४९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडिया सारखाच आहे. यात २८ दिवसांची वैधतेसोबत ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dq9i5x