Full Width(True/False)

सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

मुंबई- दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांनी गुरुवारी ही घोषणा केली. यावेळी करोना संसर्गामुळे सर्व पुरस्कारांची घोषणा उशिरा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली होती. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'महान नायक रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेली अनेक दशकं सिनेमावर राज्य करत आहेत. अभिनेते, निर्माते आणि लेखक म्हणून त्यांचं सिनेसृष्टीतलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या सर्व निवड सदस्यांनी एकमताने हे नाव दिलं.' दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे १२ वे दाक्षिणात्य अभिनेते दरम्यान, रजनीकांत हे १२ वे दाक्षिणात्य कलाकार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी डॉ.राजकुमार, अक्किनेनी नागेश्वरा राव, के. बालाचंदर या ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही बातमी समोर आल्यापासून रजनीकांत यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. दक्षिण भारतात आहे देवाचा दर्जा रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगलुळूमधील एका मराठी कुटुंबात झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर टॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळवलं. आपल्या खास स्टाइल आणि अंदाजामुळे त्यांनी बॉलीवूडमध्येही स्वतःचं वेगळ स्थान निर्माण केलं. दक्षिण भारतात चाहते रजनीकांत यांना देवाच्या स्थानी मानतात. रजनीकांत यांचे सुपरहिट सिनेमे रजनीकांत यांनी एकाहून एक हिट सिनेमे दिले आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आजही त्यांचा जलवा कायम आहे. रजनीकांत यांच्या सुपरहिट हिंदी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर दरबार, २.०, द रोबोट, त्यागी, चालबाज, अंधा कानून, कबाली, खून का कर्ज, दोस्ती दुश्मनी, इंसाफ कौन करेगा हे काही सिनेमे आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mllUxH