Full Width(True/False)

शाहिद कपूरच्या मुलीनं लिहिलं आजीला पत्र; मिशाचे हे पत्र वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक

मुंबई : अभिनेता शाहिद कपूरची पत्नी सोशल मीडियावर सक्रीय असते. मीरा तिच्या कुटुंबाचे, मुलांचे फोटो, व्हिडीओ सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. अलिकडेच मीरा राजपूतने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली असून चांगलीच चर्चेतही आली आहे. या पोस्टमध्ये मीराने तिची मुलगी मिशाने आजीला लिहिलेले पत्र शेअर केले आहे. मिशाने लिहिलेले हे पत्र मीराने इन्स्टग्रामवर शेअर केले असून तिने शाहिदची आई नीलिमा अजीम यांना टॅग केले आहे. मिशाने लिहिलेले हे पत्र युझरना खूपच आवडले आहे. त्यामुळेच मीराच्या या पोस्टला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मिशाचे आजीला पत्रमिशाने आजीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ' प्रिय आजी तुझी खूप आठवण येत आहे. तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा प्लीज मला फोन कर. तुझी लाडकी मिशा... ' शाहिद आणि मीराच्या लाडक्या लेकीने मिशाने तिच्या आजीला लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर खूपच चर्चिले जात आहे. हे पत्र पाहून मिशाला तिच्या आजीची किती आठवण येत आहे हे कळते. गेल्यावर्षी निलीमा अजीम यांच्या वाढदिवसाला मीराने त्यांच्यासाठी सोशल मीडियावर एक छानशी नोट लिहू शेअर केली होती. त्यामध्ये 'जगातील सर्वोत्तम आजीला वाढदिवसाच्या खूप सा-या शुभेच्छा. मुलांसाठी आई म्हणून तुम्ही वाघीण आहात आणि माझ्यासाठी प्रिय मैत्रीण. आई आम्ही सर्वजण तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही कायम आनंद रहा...' शाहिद आणि मीरा राजपूत यांचे २०१५ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर एका वर्षाने मीशाचा जन्म झाला. २०१८ मध्ये मीरा आणि शाहिद यांना मुलगा झाला असून त्याचे नाव त्यांनी जैन असे ठेवले आहे. मीरा राजपूत आपल्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर 'कबीर सिंह' या सिनेमात त्याने काम केले होते. त्याने 'जर्सी' या खेळावर आधारीत सिनेमात दिसणार आहे. गेल्यावर्षी या सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे हा सिनेमा रखडला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32YlDaR