Full Width(True/False)

'तू गेल्यावर RIP लिहिलं नाही', निशिकांतच्या आठवणीत संजय जाधव भावुक

मुंबई- लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते यांचं मागील वर्षी निधन झालं. त्यांना लिव्हर सिरोसिस हा आजार होता. त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचारही सुरु होते. परंतु, त्यांची मरणाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी १७ ऑगस्ट २०२० साली अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांनी एक पोस्ट करत त्यांच्या जवळच्या मित्राशी हितगुज केली आहे. मित्रांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण त्यांनी चाहत्यांसोबतही शेअर केले आहेत. संजय यांच्या एका मित्राने त्यांना काही जुने फोटो पाठवले त्यात त्यांना निशिकांत यांच्यासोबतचे फोटो मिळाले. हे फोटो पाहून त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या आणि ते आता या जगात नसल्याच्या दुःखावरची खपली निघाली. निशिकांत यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नव्हती. परंतु, आज त्यांनी त्याचं कारणही सांगितलं आहे. संजय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'तू गेल्यानंतर मी सोशल मीडियावर काहीच लिहीलं नव्हतं, कारण मन नव्हतं. काय लिहिणार? आरआयपी निशी? नाही रे, पण वासूने आज मला हे फोटो पाठवले आणि वाटलं की हे शेयर करावं.' मैत्रीचे किस्से सांगताना त्यांनी लिहिलं, 'आपल्याला पार्टी करण्यासाठी कोणतच निमित्त लागायचं नाही. सिनेमा सुरु झाला, चांगला शॉट घेतला, वाईट काम केलं, सिनेमा संपला, पहिली कॉपी निघाली, अवॉर्ड मिळाला किंवा नाही मिळाला, आपण नेहमी पार्टी केली. कोण चांगला फिल्ममेकर आहे ? तू की मी.. यावर अनेकदा आपण पार्टी करताना चर्चा केली आहे. आपल्यात नेहमी मतभेदही असायचे, आपण मुद्दे एकमेकांसमोर मांडायचो पण आपल्याकडे वेळ होता, सोनेरी क्षण.. मला खात्री आहे की अमित पवार आणि तू नव्या प्रोजेक्टबद्दल चर्चा करत असणार, नक्कीच हातात ग्लास घेऊन.. चिअर्स निशी..' आपल्या जिवलग मित्रासाठी त्यांनी ही भावनिक पोस्ट करत मन मोकळं केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xAh30w