Full Width(True/False)

मोठ्या पडद्यावर दरवळणार 'फुलराणी' चा गंध, चित्रीकरणाला सुरुवात

मुंबई- लॉकडाउन झाल्याने अनेकांच्या व्यवसायाला फटका बसला होता. त्यात मराठी चित्रपटसृष्टीचाही समावेश होता. अनेक चित्रपट प्रदर्शित व्हायचे थांबले तर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं. परंतु, आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टी जोमाने कामाला लागली आहे. मराठी सिनेसृष्टीतही नवनवीन चित्रपटांच्या घोषणा होत आहेत. होळी आणि रंगपंचमीच्या शुभमुहूर्तावर एका नव्याकोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. 'पिग्मॅलिअन' वर आधारित 'माय फेअर लेडी' हा संगीतमय चित्रपट जगभर गाजला होता. त्याच कलाकृतीने प्रेरित होऊन 'फुलराणी .... अविस्मरणीय प्रेमकहाणी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विश्वास जोशी करत असून चित्रपटातून एक अनोखी फुलराणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी आजपर्यंत नाटकांमधील फुलराणी पाहिली आहे. तिचं आयुष्य, तिची जिद्द, तिची हिम्मत पाहून प्रेक्षकांनी नाटकातील फुलराणीवर प्रचंड प्रेम केलं. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' म्हणत त्या फुलराणीने नाट्यरसिकांच्या मनावर राज्य केलं. परंतु, चित्रपटातील फुलराणी कशी असणार,कोण असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. या चित्रपटाचं लेखन गुरु ठाकूर आणि विश्वास जोशी यांनी केलं असून चित्रपटातील गाणी बालकवी आणि गुरु ठाकूर यांची आहेत. निलेश मोहरीर यांनी या गाण्यांना संगीत देण्याची जबाबदारी पार पडली आहे. चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक उत्कर्ष जाधव असून वेषभूशा सायली सोमण यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचं असून हा चित्रपट फिनक्राफ्ट मिडिया प्रोडक्शन तर्फे बनविण्यात येणार आहे. ही फुलराणी प्रेक्षकांना कितपत भावते हे पाहणं औसुक्याचं ठरेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ulYyL7