Full Width(True/False)

कुणी तरी येणार येणार गं! लग्नाच्या दीड महिन्यानंतर दिया मिर्झानं शेअर केली गोड बातमी

मुंबई- बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिया १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सोबत लग्न बंधनात अडकली होती. तिने तिच्या लग्नात अनेक प्रथांना फाटा देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. दियाच्या लग्नानंतर तिचा हनिमूनदेखील सोशल मीडियावर बराच चर्चेत होतं. त्याच कारण म्हणजे दिया तिच्या हनिमूनला तिच्या सावत्र मुलीलादेखील घेऊन गेली होती. तिच्या या निर्णयावरही चाहत्यांनी तिचं प्रचंड कौतुक केलं होतं. आता दियाने चाहत्यांना आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने सोशल मीडियावर ती लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली आहे. दियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक गोड फोटो शेअर केला आहे. त्यात ती समुद्रकिनारी उभी आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिचे दोन्ही हात तिच्या पोटावर आहे. या फोटोत तिचं बेबी बम्प दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'मी स्वतःला धन्य समजते, धरती मातेप्रमाणे एक होण्यासाठी, जीवनातील सगळ्या शक्तींसारखं होण्यासाठी जिथून प्रत्येक गोष्टीचा उगम होतो, त्या प्रत्येक अंगाईगीताचा, गोष्टींचा आणि गाण्यांचा, जिथून असंख्य आशा जन्म घेतात, मी स्वतःला धन्य समजते हा छोटासा अंकुर माझ्या गर्भात वाढवण्यासाठी....' अशी पोस्ट करत तिने तिच्या आई होण्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दियाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी दियाला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. सगळ्यांनी तिच्या होणाऱ्या बाळाला आशीर्वाद दिले आहेत. अनेकांना दियाची ही पोस्ट वाचून आश्चर्याचा धक्का तर बसला होता. परंतु, त्यांनी हा धक्का सुखद असल्याचं म्हटलं आहे. दियाने वैभव रेखीसोबत दुसरं लग्न केलं आहे. तिचं पहिलं लग्न २०१४ साली साहिल संघा सोबत झालं होतं. परंतु, काही कारणांमुळे ती त्यांच्यापासून वेगळी राहत होती. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये घटस्फोट घेतला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rGK2vv