Full Width(True/False)

'मी हिंदू आहे म्हणूनच...', कुंभमेळ्यावर भडकला सोनू निगम

मुंबई- देशभरात करोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहेत. सगळ्या सोई सुविधा कमी पडू लागल्या आहेत. हजारोंना करोनाची लागण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १५ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. कित्येक राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकार प्रत्येकाला काळजी घेण्याच आवाहन करत आहे. परंतु, अशा परिस्थितीत हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यावर बॉलिवूडचा लोकप्रिय गायक याने त्याचं मत मांडलं आहे. नुकतंच हरिद्वार येथे कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं. लाखोंच्या संख्येने भाविकांनी तिथे उपस्थिती लावली. त्यानंतर १ हजार ७०० जणांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे सोनूने या परिस्थितीवर भाष्य करत कुंभमेळ्याच्या आयोजनावर आक्षेप घेतला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं मत व्यक्त केलं. सोनू म्हणाला, 'मी दुसऱ्या कुणाच्या बाबतीत काही बोलू शकत नाही, पण एक हिंदू असल्यामुळे मी हे नक्की बोलू शकतो की या वेळेस कुंभमेळ्याचं आयोजन व्हायला नको होतं. पण ठीक आहे थोडी अक्कल आली त्याला प्रतिकात्मक केलं गेलं. मी लोकांच्या भावना समजतो पण सध्या लोकांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाहीये.' सोनूच्या मोठ्या बहिणीचे पतीदेखील पॉझिटिव्ह झाले आहेत आणि सध्या दिल्लीमधील इस्पितळात भरती आहेत. सोनूच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. सध्या स्वतःसोबत इतरांच्या जीवाचीदेखील काळजी घेतली पाहिजे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. यापूर्वीही काही बॉलिवूड कलाकारांनी कुंभमेळ्यावर भाष्य केलं होतं. मलायका अरोराने पोस्ट शेअर करत कुंभमेळ्यावर आक्षेप नोंदवला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32nCDHo