Full Width(True/False)

'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानालाच मॅकडॉनल्डने केलं अ‍ॅम्‍बेसिडर

मुंबई: मॅकडॉनल्ड इंडियाने त्‍यांच्‍या प्रमुख जाहिरातींसाठी ब्रॅण्‍ड अॅम्बेसिडर म्‍हणून लोकप्रिय चित्रपट सेलिब्रिटी रश्मिका मंदानाची निवड केली आहे. रश्मिका घराघरांमध्‍ये ओळखीची असून चाहत्यांमध्ये, विशेषत: दक्षिण भारतातील राज्‍यांमध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय आहे. तिने तेलगु व कन्‍नड चित्रपटांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. 'चलो', 'किरिक पार्टी', 'सरिलेरू नीकेवरू', 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉमरेड' या चित्रपटांना २०० दशलक्षहून अधिक व्‍ह्यूज मिळाले आहेत. रश्मिका लवकरच अल्‍लु अर्जुनसोबत मॅगनम ओपसचा चित्रपट 'पुष्‍पा'मध्‍ये दिसणार आहे आणि दोन सलग हिंदी चित्रपटांसह बॉलिवूडमध्‍येदेखील पदार्पण करणार आहे. अल्‍पावधीतच ती तरुणांची आयकॉन बनली आहे. तिचे सोशल मीडियावर असंख्य फॉलोअर्स असण्‍यासोबत फक्त इन्‍स्‍टाग्रामवर १५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. या सहयोगाच्‍या घोषणेबाबत बोलताना मॅकडॉनल्ड इंडियाच्‍या (पश्चिम व दक्षिण) मार्केटिंग व कम्‍युनिकेशन्‍सचे संचालक अरविंद आरपी म्‍हणाले, 'आम्‍हाला रश्मिकाची ब्रॅण्‍ड अॅम्बेसिडर म्‍हणून निवड करण्‍याचा आनंद होत आहे. ती असंख्य चाहत्यांसाठी लोकप्रिय युथ आयकॉन आहे.' 'नॅशनल क्रश' म्‍हणून लोकप्रिय असलेल्‍या रश्मिकाने विविध प्रसंगी तिच्‍या सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून खाद्यपदार्थांप्रती प्रेम व्‍यक्‍त केले आहे. रश्मिका प्रमुख ब्रॅण्‍ड मोहिमांचा भाग असणार आहे आणि प्रमुख बाजारपेठांमध्‍ये मॅकडॉनल्डसाठी ब्रॅण्‍डबद्दल लोकांमध्ये प्रेम वाढवण्‍यामध्‍ये प्रमुख भूमिका बजावेल. ब्रॅण्‍ड अॅम्बेसिडर म्हणून निवड झाल्यानंतर अभिनेत्री म्‍हणाली, 'मॅकडॉनल्ड हा बालपणापासून माझा आवडता ब्रॅण्‍ड राहिला आहे. मी कॉलेजमध्‍ये असताना फूडसाठी मॅकडॉनल्ड्सवरच अवलंबून राहिले. ते माझ्याकडे या सहयोगासाठी आले तेव्‍हा मला खूपच आनंद झाला. तसेच ग्राहकांना उत्तम दर्जाचे स्‍वादिष्‍ट फूड देणाऱ्या ब्रॅण्‍डचे प्रति‍निधित्‍व करण्‍याचा मला आनंद होत आहे. मॅकडॉनल्ड २५ वर्षांपासून भारतीय ग्राहकांना सेवा देत आला आहे आणि त्‍यामध्‍ये वाढ होत आहे. हा ब्रॅण्‍ड निश्चितच सर्व वयोगटातील व्‍यक्‍तींचा पसंतीचा बनला आहे. मी अशा अद्भुत व विश्‍वसनीय ब्रॅण्‍डसोबतच्‍या माझ्या सहयोगाबाबत खूपच उत्‍सुक आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3drPzlR