Full Width(True/False)

आयफोन चाहत्यांसाठी एक गुड न्यूज तर एक बॅड न्यूज, कंपनी लवकरच घेणार हा निर्णय

नवी दिल्लीः दिग्गज टेक कंपनी अॅपल २०२२ मध्ये लाँच करण्यात येणाऱ्या संबंधी एक मोठी प्लानिंग करीत आहे. सिक्योरिटी अॅनालिस्ट मिंग ची कुओने आपल्या रिपोर्टमध्ये एक अशी माहिती दिली आहे की, जो आयफोन चाहत्यांना निराश करु शकते. कुओने सांगितले की, अॅपल आपल्या ५.४ इंचाच्या स्क्रीनचे मिनी आयफोनला बंद करू शकते. यात एक चांगली बातमी म्हणजेच कंपनी ६.१ आणि ६.७ इंचाच्या स्क्रीनचे नवीन मॉडल लाँच करू शकते. वाचाः कंपनी लाइनअप मध्ये जोडणार स्क्रीन साइजचे मॉडल कुओने रिपोर्ट मध्ये सांगितले की, २०२२ आयफोन मध्ये लाइनअप मध्ये दोन ६.१ इंच आणि दोन ६.७ इंचांच्या मॉडलला जोडणार आहे. हे आयफोन १२ फॅमिलप्रमाणे असतील. आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रो ६.१ इंचाचे आहेत. तर आयफोन १२ प्रो मॅक्स ६.७ इंच स्क्रीनमध्ये येते. वाचाः आयफोन १२ मिनीवरून कंपनी घेणार मोठा निर्णय १२ लाइनअप मध्ये अजून ५.४ इंच स्क्रीनचा आयफोन १२ मिनीचा समावेश आहे. याची कंमत ६३ हजार ९०० रुपये आहे. कुओच्या माहितीनुसार, कंपनी २०२२ मध्ये याला अपग्रेड करण्याचा निर्णय घेऊ शकते. तसेच याला डिसकंटिन्यू सुद्धा करू शकते. कारण, छोट्या स्क्रीनच्या साइजमुळे या फोनची विक्री फारशी झाली नाही. वाचाः २०२२ आयफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार
  • कुओने नोटमध्ये म्हटले की, २०२२ मधील आयफोनच्या हाय अँड मॉडलमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर मिळणार आहे. नवीन मॉडल मध्ये १.२५ मायक्रोन पिक्सल साइज असू शकते.
  • कुओने मॅकरुमर्स यांना सांगितले की, नवीन 2H22 आयफोन मध्ये डायरेक्ट 48 मेगापिक्सल आउटपुट आणि 12 मेगापिक्सल आउटपुट चा सपोर्ट मिळणार आहे. १२ मेगापिक्सल आउटपूटसोबत नवीन 2H22 आयफोन चे CIS पिक्सल साइज जवळपास 2.5um पर्यंत वाढवता येऊ शकते. आयफोन १२ च्या तुलनेत हे खूप मोठे आहे.
  • २०२२ आयफोन मॉडल फोन कॅमेरा फोटोग्राफीला नवीन स्तरावर घेऊन जाणार आहे. यात ८ के व्हिडिओ रिकॉर्डिंगचे फीचर सुद्धा मिळू शकते. सोबत हे ऑर्ग्मेंटेड रियलिटी आणि मिक्स्ड रियलिटीच्या एक्सपीरियन्सला आणखी चांगले बनवू शकते.
वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sua4CQ