Full Width(True/False)

मिस युनिव्हर्स- महेश भूपती, लारा दत्ताच्या या गोष्टी माहीत नसतील

मुंबई: माजी आणि अभिनेत्री लारा दत्ताचा आतापर्यंतचा प्रवास नक्कीच अभिमानास्पद आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जन्मलेल्या लाराने आपल्या सौंदर्याने सातासमुद्रापार झेंडे रोवत, २००० मध्ये मिस युनिव्हर्स हा मानाचा किताब आपल्या नावावर केला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. २००३ मध्ये तिचा पहिला सिनेमा 'अंदाज' प्रदर्शित झाला. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. लाराचे वडील पंजाबी आणि आई अँग्लो इंडियन होती. आहे. लाराने मिस युनिव्हर्स हा सन्मान मिळवत आपल्या देशाचे नाव अभिमानाने उंचावले. त्यानंतर तिने बॉलिवूडची वाट पकडली. लाराने 'पार्टनर', 'मस्ती','नो एंट्री', 'भागमभाग', 'हाउसफुल्ल', 'चलो दिल्ली' यासारख्या अनेक हिट सिनेमांत काम केले. हे सिनेमे करत असताना लारा मॉडेलिंगही करत होती. मॉडेलिंग, अभिनयामुळे लारा जशी चर्चेत होती तसेच तिच्या अफेअरमुळेही ती चर्चेत राहिली. डोर्जीपासून दिनो मोरियापर्यंत अनेकांशी तिचे नाव जोडले गेले होते. त्याचा परिणाम तिच्या करिअरवही झाला. याच काळात लाराची भेट भारताचा टेनिसपटू महेश भूपतीशी झाली. हे दोघं जेव्हा भेटायला लागले तेव्हा महेश आधीच विवाहीत होता. महेशचा साधा, सरळ स्वभाव लाराला आवडला. हळूहळू या दोघांमध्ये प्रेमाचे नाते फुलले आणि महेशने सात वर्षांच्या त्याच्या लग्नाला तिलांजली देत २०११ मध्ये लाराशी लग्न केले. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव सायरा असे आहे. लारा तिच्या मुलीचे फोटो कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्याला तिचे चाहते भरभरून प्रतिसादही देत असतात. महेशशी लग्न केल्यानंतर लारा सिनेसृष्टीपासून लांब गेली असली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. गरोदरपणातले लाराचे योगसाधना करतानाचे फोटो आणि व्हिडिओ तेव्हा चर्चेचा विषय झाला होता. अजूनही ती आपले व्यायामाचे फोटो सातत्याने शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिची 'हंड्रेड' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये तिने साकारलेली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका चाहत्यांना आवडली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aiBuoG