Full Width(True/False)

'पठाण'साठी सलमानने केलं फुकट काम, निर्माते देणार खास सरप्राइज

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात याचा बहुचर्चित '' सिनेमा कधी रिलीज होतो याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. या सिनेमात शाहरुखची प्रमुख भूमिका असून त्याच्याशिवाय पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे! या दोघांनाही पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते कमालीचे उत्सुक आहे. अर्थात करोनामुळे या सिनेमाचे चित्रीकरण थांबले असले तरी लवकरच ते सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सलमानने एकही रुपया घेतला नाही! आदित्य चोप्रा याची निर्मिती असलेल्या सिनेमात सलमानची छोटीशीच भूमिका आहे. परंतु या भूमिकेसाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. सलमानची भूमिका असलेल्या काही सीनचे चित्रीकरण यशराज स्टुडिओमध्ये झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कामासाठी जेव्हा सलमानला मानधनाबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने मानधन घेणार नकार दिला. इतकेच नाही तर सलमान म्हणाला की, 'शाहरुख मला भावासारखा आहे. मी त्याच्यासाठी काहीही करू शकतो.' यानंतरही निर्मात्यांनी सलमानला मानधनासाठी सातत्याने विचारले असता तो मस्करीत म्हणाला, 'मला टायगर आणि पठाण या दोघांचे मिळून जेवढे मानधन होईल तेवढे द्या...' सलमानचे औदार्य पाहून निर्मात्यांनी त्याला एक महागडी भेटवस्तू देण्याचा विचार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, 'पठाण' सिनेमात सलमान त्याच्या टायगर सिनेमातील भूमिकेतच दिसणार असल्याची चर्चा आहे. 'झिरो'तही होता पाहुणा कलाकार शाहरुखचा २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'झिरो' सिनेमातही सलमानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या सिनेमात दोघांवर एक गाणे चित्रीत करण्यात आले होते. याआधी सलमान शाहरुखच्या 'कुछ कुछ होता है,' 'ओम शांति ओम' या सिनेमांत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. सलमान खानच्या सिनेमांबद्दल सांगायचे तर त्याचा 'राधे...' हा सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज होणार होता. परंतु करोनामुळे सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mRoyv6