मुंबई: देशामध्ये करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील वैद्यकीय यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. पुरेशा उपचारांअभावी लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कलाकार मंडळींनी सरकारला मदतीचा हात देऊ केला असून गरजू लोकांना औषधे, ऑक्सिजन, हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी देशव्यापी पातळीवर व्हॅक्सिनेशन मोहिम राबवली जात आहे. लोकांमध्ये व्हॅक्सिनेशबाबत जागृती यावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सरकारच्या या प्रयत्नांना कलाकार मंडळीही साथ देत आहेत. करीनानेही तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून करोना व्हॅक्सिन घेण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर टॉम आणि जेरीचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टॉम हा करोना व्हायरस म्हणून दाखवला आहे तर प्रतिकार शक्ती म्हणून जेरीला दाखवले आहे. या दोघांची झकाझकी हा व्हिडिओ शेअर करत करिनाने एक पोस्टही लिहिली आहे. ती या पोस्टमध्ये म्हणते की, ' आपल्याला अनेकदा कल्पनाही नसते की आपली मुले आपले अनुकरण करत असतात. इतकेच नाही तर सभोवतालचे सगळे वातावरण बघत असतात. सध्याचे वातावरण ही बघत आहेत आणि ते पाहून ही मुले घाबरली आहेत...' करीना पुढे लिहिते की, ' सध्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीला आपण सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जायला हवे. एक टीम म्हणून या संकटाशी मुकाबला करायला हवा. त्याचाच एक भाग म्हणून सर्व लोकांनी करोना व्हॅक्सिन घेणे अतिशय गरजेचे असू ते सोपे आणि सहजपणे घेता येते.' देशातील वातावरण आणि लहान मुलांबद्दल करीना म्हणते, 'देशात सध्या जे वातावरण आहे, त्याबद्दल मुलांना समजेल अशा सोप्या शब्दांत आपण त्याची माहिती द्यायला हवी. त्याचप्रमाणे आपल्याकडेही या परिस्थितीला सहन करण्याची सहनशक्ती हवी. तसेच या संकटकाळामध्ये गरजू लोकांना मदत करायला हवी. विशेषतः जे आपल्याला मदत करत आहेत ते वैद्यकीय कर्मचारी, फार्मा कर्मचारी, वेगवेगळ्या यंत्रणांमधील कर्मचारी आणि असंख्य व्हॉलेंटिअर जे वर्कफ्रंटवर काम करत आहेत... त्यामुळे व्हॅक्सिन घेण्यासाठी जे निकष आहेत त्यासाठी जे पात्र आहेत त्यांनी स्वतःची नोंदणी करावी आणि योग्य वेळ आल्यानंतर व्हॅक्सिन घ्यावे....' दरम्यान, अलिकडेच करीनाने करोना परिस्थितीवर भाष्य करणारी एक नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये तिने करोना आटोक्यात आणण्यासाठी जे नियम लागू केले आहेत, त्याचे उल्लंघन करणा-यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशा बेजबाबदार लोकांमुळे देशावर ही परिस्थिती ओढावली असल्याचे मत करीनाने व्यक्त केले होते. करिनाने नमूद केले आहे. या नोटमध्ये तिने म्हटले होते की, 'करोना आटोक्यात आणण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. त्यामध्ये घराबाहेर पडताना चेह-यावर मास्क नीट पद्धतीने लावणे अपेक्षित आहे. परंतु घराबाहेर पडताना अनेकजण चुकीच्या पद्धतीने मास्क लावतात आणि करोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. अशा पद्धतीने वागणा-यांनी करोनाविरोधात लढणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचा-यांचा किमान एकदा तरी विचार करायला हवा...' असे मत तिने मांडले होते
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eDinat