Full Width(True/False)

'गोंधळ निस्तरता येत नाही म्हणून मोदीजींची आठवण आली का?'

मुंबई : अभिनेत्री कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. प्रत्येक घटनेवर ती तिचे मत सोशल मीडियावर मांडत असते. त्यामुळे तिच्यावर अनेकदा टीका देखील होत असते. आताही तिने दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्या कार्यपद्धतीवर सोशल मीडियावर टीका केली आहे. कंगनाने केलेल्या या टीकेमुळे तिला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत करोनाची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. यासोबतच करोना रुग्णांवर उपचारासाठी बेड कमी पडत आहे तसेच ऑक्सिजनही कमी पडत आहे. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु हे प्रयत्न कमी पडत असल्याने केंद्र सरकारने मदत करावी, असे आवाहन केजरीवाल यांनी एका पत्राद्वारे केले. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या या चिठ्ठीमुळे कंगनाने त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ती लिहिते, 'वाचवा.. वाचवा.. मोदीजी वाचवा.. आम्ही जेवढा गोंधळ घालायचा होता तेवढा घातला आहे... आता तुम्ही हा गोंधळ निस्तरा.. हा गोंधळ आणि तुमची दिल्ली, तुम्हीच सांभाळा. तुम्ही काहीही बोललात तरी त्या मागचा अर्थ बदलू शकत नाही अरविंद केजरीवाल.' कंगनाने केलेल्या टीकेमुळे अनेक युझर्सने तिच्यावर कडाडून हल्ला करत ट्रोल केले आहे. एका युझरने लिहिले, 'मॅडम, तुमच्या मोदींनी केवळ आणि केवळ निवडणुका जिंकण्यासाठी संपूर्ण देशामध्ये जो काही गोंधळ घातला आहे तो अन्य कोणत्याही नेत्याने कधी घातलेला नाही. देशातील सर्वात जबाबदार असलेल्या या व्यक्तीने निवडणूक प्रचार फेऱ्या काढून करोनाचे नियम तोडण्याची काय गरज होती?' तर एका युझरने तर कंगनावर पराकोटीची टीका केली आहे. तो म्हणाला, 'तू जे काही बोलतेस ते फालतूच असते. ज्या राज्यांकडे बेड नाहीत, ऑक्सिजन नाहीत ते मदतीसाठी केंद्राकडे मागणी करणार ना. करोनाचे पेशंट दिवसागणिक इतक्या संख्येने वाढत आहेत त्यामुळे राज्यातील वैद्यकीय सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे तू टोमणे मारणे बंद कर आणि शक्य असेल तर लोकांना मदत कर... ' तर अन्य एका युझरने लिहिले की, 'आधी तू जरा बरं बोलत होतीस. परंतु याचा अर्थ असा नाही की तू आता जे काही बोलात आहेस ते योग्यच असेल. कोणतीही माहिती घेतल्याशिवाय काहीही बोलू नको. जर केंद्र सरकारने केजरीवाल यांच्याकडे पूर्ण अधिकार दिले तर ते आणखी चांगले काम करू शकतील, हे तू लक्षात ठेव.' आणखी एक युझर म्हणाला,'अरविंद केजरीवाल यांनी आपल्याच देशाच्या पंतप्रधानांची मदत मागितली आहे ना... अन्य कोणत्या देशाकडून तर मदत मागितली नाहीए. आता मोदींजींचे हे कर्तव्य आहे आणि काम आहे की त्यांनी मतभेद विसरून या देशातील नागरिकांना मदत केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीचे ट्वीट करून या गोंधळ अजून वाढवू नको ही विनंती आहे.' अशा प्रकारे कंगनाला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. अर्थात या सगळ्याचा कंगनावर किती परिणाम होतो हे तर सर्वश्रुत आहेच. दरम्यान, कंगनाच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे तर, तमिळनाडूच्या मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारीत 'थलायवी' या सिनेमात तिने काम केले आहे. करोनामुळे या सिनेमाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंगनाकडे 'तेजस' आणि 'धाकड' हे दोन सिनेमे आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dvrUkA