Full Width(True/False)

करोनाकाळात वाढले डिजिटल व्यवहार, ‘भीम’द्वारे उच्चांकी व्यवहार, ‘फास्टॅग’द्वारे २० कोटी व्यवहार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली करोनाकाळात ांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, मार्च महिन्यात ‘ यूपीआय’ अॅपवरून विक्रमी व्यवहार नोंदविण्यात आले आहेत. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या (एनपीसीआय) ताज्या आकडेवारीनुसार मार्च २०२१मध्ये देशात ‘भीम यूपीआय’ अॅपवरून २७३ कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. तत्पूर्वी, गेल्या वर्षी याच कालावधीत १२५ कोटी व्यवहार झाले होते. वाचाः ‘एनपीसीआय’च्या माहितीनुसार मार्च २०२१मध्ये ‘भीम यूपीआय’द्वारे एकूण पाच लाख चार हजार ८८६ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली. मार्च २०२०मध्ये एकूण दोन लाख सहा हजार ४६२ कोटी रुपयांचे व्यवहार नोंदविण्यात आले होते. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये दुप्पट मूल्याचे व्यवहार झाले आहेत. फेब्रुवारी २०२१मध्ये ‘भीम यूपीआय’च्या माध्यमातून २२९ कोटी व्यवहार नोंदवले गेले होते. फेब्रुवारी महिन्यात एकूण चार लाख २५ हजार ६२ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे दिसून आले आहे. वाचाः ‘’द्वारे २० कोटी व्यवहार जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार मार्च २०२१मध्ये ‘आयएमपीएस’सह ‘रिअल टाइम सेटलमेंट’द्वारे (आरटीजीएस) ३६.३१ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून तीन लाख २७ हजार २३४.४३ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली. ‘भारत बिल पे’च्या माध्यमातून ३.५२ कोटी व्यवहार झाले. या माध्यमातून १९५.७६ कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्याच वेळी ‘फास्टॅग’च्या माध्यमातून १९.३२ कोटी व्यवहार झाल्याची नोंद झाली आहे. या द्वारे एकूण ३,०८६.३२ कोटी रुपयांची रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा झाली. वाचाः नव्या प्लॅटफॉर्मसाठी अर्ज सादर ‘एनपीसीआय’प्रमाणेच ‘न्यू अम्ब्रेला एंटिटी’ची (एनयूई) स्थापना करण्यासाठी वित्तीय संस्थांच्या पाच गटांनी (कन्सॉर्शियम) रिझर्व्ह बँकेकडे अर्ज सादर केले आहेत. हे सर्व प्लॅटफॉर्म ‘एनपीसीआय’प्रमाणेच सोयी देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सध्या डिजिटल पेमेंट श्रेणीमध्ये ‘एनपीसीआय’ची मक्तेदारी आहे. मात्र, खासगी कंपन्यांच्या आगमनामु‌ळे आगमनामुळे ‘एनपीसीआय’समोर आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडे अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ होती. सद्य परिस्थितीत ‘रुपे’, ‘यूपीआय’सह अन्य रिटेल पेमेंट सेवांसाठी ‘एनपीसीआय’ मध्यवर्ती संस्था म्हणून कार्य करते. वाचाः अर्ज केलेले कन्सॉर्शियम १) अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, अॅमेझॉन, व्हिसा, पाइन लॅब्ज आणि बिलडेस्क २) फर्बाइन (टाटा समूह), कोटक बँक, एचडीएफसी बँक, एअरटेल डिजिटल, फ्लिपकार्ट, मास्टरकार्ड आणि पे यू ३) पेटीएम, ओला फायनान्शियल, ईपीएस, इंड्सइंड बँक, सेंट्रम फायनान्स आणि झिटा पे ४) रिलायन्स जिओ, इन्फिबीम ५) इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि रेझर पे करोनाकाळात वाढले डिजिटल व्यवहार वर्षभरात ‘भीम यूपीआय’वरील व्यवहारांत ११८ टक्के वाढ महिना व्यवहारांची संख्या मार्च २०२० १२५ कोटी फेब्रुवारी २०२१ २२९ कोटी मार्च २०२१ २७३ कोटी (स्रोत : एनपीसीआय) वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fzJ69W